शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेली : स्वागतासाठी उभा राहताे, कार्यक्रमाची शाेभा वाढविताे; पण ताे पुतळा नव्हे!

By गेापाल लाजुरकर | Updated: April 19, 2023 18:10 IST

एक तरी कला असावी अंगी, असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे अंग बनले आहे.

गडचिराेली - एक तरी कला असावी अंगी, असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे अंग बनले आहे. एखादा जिवंत व्यक्ती डोळ्यांची पापणी न हलवता, गुदगुल्या लावल्यानंतरही हालचाल न करता पुतळ्याप्रमाणे तीन तास स्थिर उभा राहत असेल तर ती एक कलाच आहे. अशी कलासुद्धा मानवाला आकर्षित करू शकते. हीच कला आज रोजगाराचे साधन बनली आहे. ताे स्वागतासाठी उभा राहताे, कार्यक्रमाची शाेभा वाढविताे; पण ताे पुतळा नव्हे, तर व्यक्ती हाेय.

देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथील एक व्यक्ती लग्नसमारंभात पोटासाठी जिवंत माणसाचा पुतळा बनून लाेकांच्या स्वागतासाठी उभा राहतो. त्या व्यक्तीचे नाव आहे विजय टिकले. ५२ वर्षांचा हा कालावंत २०१६ पासून समारंभांमध्ये लाेकांच्या स्वागताचे काम करीत आहे. शारीरिक उंचीने लहान असल्याने ही त्याची अंगभूत कला आता त्याच्या उत्पन्नाचे साधन बनले आहे. आरमोरी येथे मागील आठवड्यात झालेल्या स्वागत समारंभात मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहून विजय टिकले पुतळा बनवून लाेकांचे मनोरंजन करीत होते. त्यांची ही कला आता पाेटापाण्याचे साधन बनली आहे. समारंभात येणारे पाहुणे टिकले यांची स्वागत करण्याची कला पाहतच असतात. काही क्षण तरी ते प्रवेशद्वारावर थांबल्याशिवाय राहत नाही.

किती मिळते मानधन?

विवाह समारंभ, वाढदिवस, स्वागत समारंभ आदी कार्यक्रमांत पाहुण्यांच्या स्वागतासाठी विजय टिकले यांना बाेलाविले जाते. वर्षभर टिकले यांच्या तारखा बुक असतात. शिक्षण कमी असले, तरी आपल्यात कलागुण असले तरा माणूस उपाशी राहत नाही, याचेच उदाहरण म्हणजे विजय टिकले हे आहेत. समारंभातील ३ तासांकरिता एक ते दीड हजार रुपये मानधन विजय टिकले हे घेतात.परजिल्ह्यातही स्वागत; आतापर्यंत ४०० वर कार्यक्रम

विजय टिकले यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. यासाेबतच त्यांच्याकडे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. स्वागत करण्याची त्यांची कला पाहून देसाईगंज पं.स.चे माजी सभापती परसराम टिकले यांनी त्यांना पाेशाख उपलब्ध करून दिला. सुरुवातीला अतिशय कमी मानधनावर त्यांनी आपली कला दाखविली. प्रतिसाद वाढल्यानंतर यात काही प्रमाणात वाढ केली. आतापर्यंत त्यांनी विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आदी जिल्ह्यांसह मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांतील काही ठिकाणी कला दाखवीत एकूण ४०० वर कार्यक्रम केले आहेत.