शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राकाँत पुन्हा शीतयुध्द सुरू

By admin | Updated: November 23, 2014 23:19 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा गटातटाच्या राजकारणात शीतयुध्द सुरू झाले आहे. पक्षाच्या दारूण पराभवानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांना पक्षातून बडतर्फ करावे,

धाईत यांचे प्रदेशाध्यक्षांना निवेदन : जिल्हाध्यक्षांना बडतर्फ करागडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा गटातटाच्या राजकारणात शीतयुध्द सुरू झाले आहे. पक्षाच्या दारूण पराभवानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांना पक्षातून बडतर्फ करावे, अशी मागणी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्याम वासुदेव धाईत यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. तटकरे यांना पाठविलेल्या पत्रात धाईत यांनी म्हटले आहे की, पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचे ध्येय, धोरणाला तिलांजली दिल्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत तिनही मतदार संघामध्ये पक्षाला पराभव पत्करावा लागला. दोन क्षेत्रामध्ये पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कमही वाचू शकली नाही. याची सर्वस्वी जबाबदारी घेऊन धर्मरावबाबा आत्राम यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा, मात्र अद्याप त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करावे, अशी मागणीही धाईत यांनी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम हे अहेरी क्षेत्रातून उभे होते. पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे पक्षाचा पराभव येथे झाला तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून त्यांनी आपली कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांचीही अनामत रक्कम जप्त झाली. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाकडे सुरूवातीला उमेदवारी मागणारे सेवानिवृत्त सनदी अधिकारी एन. बी. वटी यांना वेळेवर उमेदवारी देण्यात आली. या भागातील कोणत्याही पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ही उमेदवारी कशी देण्यात आली, हाही स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. त्यामुळेच वटी यांना केवळ २८०० मते मिळून त्यांचीही अनामत जप्त झाली. पक्षाकडून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराला प्रचार साहित्यही देण्यात आले नाही, असे धाईत यांनी या पत्रात म्हटले आहे. पराभवानंतर पक्ष कार्यकर्ते पूर्णत: पोरके झाले असून स्थानिकस्तरावर कोणताही संवाद पक्ष नेतृत्वाचा राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना बडतर्फ करून माजी अध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांना अधिकार सोपविण्यात यावे, अशी मागणीही धाईत यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)