गडचिरोली येथून आरमोरीकडे जाणाऱ्या मार्गावर कठाणी नदीच्या पुलावरील कठडे तुटले आहेत. तर एक लोखंडी राळ रस्त्यावर आला आहे. पुलावरील कठड्याची ऐसीतैसी झाल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र कठड्याच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोली-आरमोरी मार्गावर दिवसा व रात्री जड व प्रवाशी वाहनांची मोठी वर्दळ राहते. त्यामुळे धोका होण्याची शक्यता दाट आहे.
पुलावरील कठड्याची ऐसीतैसी :
By admin | Updated: May 18, 2015 01:37 IST