शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बंधनकारक फेऱ्यांमुळे एसटी अडचणीत

By admin | Updated: December 4, 2014 23:07 IST

एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा

गडचिरोली आगार : प्रति किलोमीटर २३ रूपये व प्रतिदिवस अडीच लाखांचा तोटागडचिरोली : एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा तर दर दिवशी अडीच लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती राज्याच्या इतर आगारांमध्ये असल्याचे दिसून येते. गाव तिथे एसटी ही बिद्रवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण तसेच दुर्गम भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. त्यामुळेच एसटीला राज्याची लोकवाहिणी म्हणून ओळखल्या जाते. नफ्यापेक्षाही लोकसेवेचा विचार पुढे करून रस्तयांवरील खाचखडगे पार करीत एसटी धावत असल्याने एसटी विषयी नागरिकांच्या मनात एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. या सर्व कसरती करीत असताना एसटीला स्वत:ला मात्र तोट्याचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली एसटी आगारसुध्दा यापासून अपवाद नाही. गडचिरोली आगारात एकूण ११० बसेस आहेत. या संपूर्ण बसेसच्या दिवसाच्या एकूण ५७६ बसफेऱ्या होतात. या बसफेऱ्यांमधून गडचिरोली आगाराला दिवसाकाटी ८.५ ते ९ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र एसटीचा प्रत्यक्ष खर्च मात्र यापेक्षाही जास्त असल्याने महिन्याच्या शेवटी हिशेब काढल्यानंतर एसटीला तोटा झाल्याचे लक्षात येते. एकूण बसफेऱ्यांपैकी सुमारे २१९ बसफेऱ्या बंधनकारक आहेत. यामध्ये १३७ बसफेऱ्या मानवविकास मिशनच्या बसगाड्यांच्या तर एसटीच्या स्वत:च्या बसेसच्या ८२ बसफेऱ्यांचा समावेश आहे. बंधनकारक बसफेऱ्यांमध्ये अपवाद वगळता नेहमीच तोटा सहन करावा लागतो. मात्र जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने या बसफेऱ्या चालविल्या जातात. या मार्गावर धावणाऱ्या बसेस बऱ्याचवेळा प्रवाशी घेऊन गेल्या तर आगारात येतेवेळी रिकाम्या येतात. आगारात येतेवेळी प्रवाशी घेऊन आल्या तर जातेवेळी रिकाम्या जातात. एसटीचा प्रतीकिमीचा खर्च सरासरी ३५ रूपये आहे. मात्र या मार्गावर बऱ्याचवेळा एसटी बिनाप्रवाशी धावत असल्याने सरासरी १२ रूपये प्रती किमी उत्पन्न प्राप्त होते. परिणामी एसटीला प्रती किमीमागे २३ रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. गडचिरोली आगारातील मानव विकास मिशनच्या बसेस दर दिवशी ६ हजार किमी तर इतर बसेस ४ हजार ५०० किमी बंधनकारक मार्गांवर धावतात. एसटीचा पूर्ण खर्च भरून निघण्यासाठी ३५ रूपये किमीप्रमाणे या बसफेऱ्यांमधून दरदिवशी ३ लाख ६७ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र १ लाख २६ हजार रूपयांचेच उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे दरदिवशी २ लाख ४१ हजार रूपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागतो. बंधनकारक बसफेऱ्यांमुळे होणारा तोटा लक्षात घेऊन एसटीने व्यवहारीकतेचे धोरण अवलंबण्यास सुरूवात केली तर या सर्व बसफेऱ्या बंद कराव्या लागतील. मात्र या बंद झाल्यास ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा दबाव वाढतो. एसटी महामंडळ हे राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले महामंडळ आहे. त्यामुळे व्यवहारिकता व लोकसेवा या दोघांचाही ताळमेळ एसटीला जोडावा लागतो. हे सर्व करीत असताना एसटी मात्र नेहमीच तोट्याचा सामना करीत आलेली आहे. (नगर प्रतिनिधी)