शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

शिवभक्तांसाठी एसटी सज्ज

By admin | Updated: February 12, 2015 01:06 IST

महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात मार्र्कं डादेव, चपराळा, कालेश्वर, भटाळा, शिरपूर व व्यंकटापूर येथे यात्रा भरते. यात्रेच्या निमित्ताने हजारो शिवभक्त या स्थळांना भेटी देतात.

लोकमत विशेषगडचिरोली : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात मार्र्कं डादेव, चपराळा, कालेश्वर, भटाळा, शिरपूर व व्यंकटापूर येथे यात्रा भरते. यात्रेच्या निमित्ताने हजारो शिवभक्त या स्थळांना भेटी देतात. शिवभक्तांना यात्रेच्या ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी एसटी विभागाने आठ दिवसांपूर्वीच नियोजन केले असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून सुमारे ११८ बसेस शिवभक्तांसाठी वेगवेगळ्या आगारातून सोडल्या जाणार आहेत. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाते. या ठिकाणी दर महाशिवरात्रीला आठ दिवसांची यात्रा भरत असून या यात्रेला विदर्भासह राज्यातील हजारो शिवभक्त येतात. शिवभक्तांना यात्रेच्या ठिकाणी सोडण्याची सेवा करण्याबरोबरच एसटीला उत्पन्नाचे साधनही प्राप्त होत असल्याने एसटी विभागसुद्धा यात्रेच्या निमित्ताने विशेष तयारी करते. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा पर्व असल्याने आरोग्य, पोलीस विभागही विशेष सतर्क राहतात. महाशिवरात्रीला १७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असली तरी यात्रेकरू मात्र १६ फेब्रुवारीपासूनच जाणार आहेत. त्यादृष्टीने एसटी विभागाने १४ ते २१ फेब्रुवारी दरम्यानचे एसटी बसेसचे नियोजन केले आहे. यात्रांसाठी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली, अहेरी, राजुरा, चिमूर व वरोरा आगाराच्या बसेसही मागविण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसोबतच चंद्रपूर जिल्ह्यातीलही नागरिकांसाठी मार्र्कंडादेव येथील यात्रा एक विशेष पर्व मानले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील यात्रेकरू हरणघाट व साखरीमार्गे येतात. यासाठी मुल येथून विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर साखरी येथे अस्थायी बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, राजुरा, वरोरा येथूनही स्वतंत्र बसेस सोडल्या जाणार आहेत. मार्र्कंडादेव यात्रेबरोबरच चपराळा, तेलंगणातील कालेश्वर येथेही हजारो भाविक महाशिवरात्रीच्या निमित्त जातात. या दोन्ही ठिकाणांना अहेरी आगाराच्या बसेस विशेष सेवा देणार आहेत. यात्रेकरूंची संख्या बघून विशेष बस सोडण्याचेही नियोजन आगाराने केले आहेत. प्रत्येक अस्थायी आगारात यात्रेकरू व एसटी कर्मचाऱ्यांसाठी पाणी भरलेले टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहे. एकंदरीतच प्रवासादरम्यान यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी विभागाने विशेष खबरदारी घेणार आहे. (नगर प्रतिनिधी)इतर आगारांकडून मागितल्या बसेसगडचिरोली आगाराकडे जवळपास ८० बसेस आहेत. यापैकी काही बसेस नियमित मार्गासाठी उपलब्ध करून द्याव्याच लागतात. गडचिरोली आगाराने मार्र्कं डा यात्रेसाठी ३० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र यादरम्यान प्रवाशांची संख्या जास्त राहत असल्याने एवढ्या बसेसच्या भरवशावर काम चालणे अशक्य असल्याने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अहेरी आगारांनाही संबंधित आगारातून बस सोडण्याची विनंती केली आहे. त्यानुसार ब्रह्मपूरी आगारातून १५, चंद्रपूर आगारातून ३०, अहेरी आगारातून १२, राजुरा आगारातून १५, चिमूर आगारातून १० व वरोरा आगारातून ६ बसेस सोडल्या जाणार आहेत. चोरट्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी मुल, सावली, चामोर्शी, आष्टी, गोंडपिपरी मार्गांवर सुरक्षा पथक कार्यरत ठेवले जाणार आहे. या पथकांकडून नियमितपणे बसेसची तपासणी केली जाऊन विना तिकीट प्रवाशांवर आळा घातला जाणार आहे.