शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्याही वर्षी पंढरपूरच्या वारीला मुकणार ‘एसटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून पंढरपूरच्या यात्रेची ओळख आहे. यावर्षी ही यात्रा ११ ते २४ जुलै यादरम्यान हाेणार हाेती. मात्र, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली. राज्यभरातील काही निवडक दिंड्यांच्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील काैंडण्यपूर येथील दिंडीचा समावेश आहे

ठळक मुद्देनिवडक १० दिंड्यांनाच परवानगी : राज्यभरातील भाविकांचा हिरमोड

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दरवर्षी जमणारा भक्तांचा मेळा यावर्षीही दिसणार नाही. कोरोनाची दुसरी लाट बऱ्याच प्रमाणात ओसरली असली तरी खबरदारी म्हणून यात्राच रद्द केल्याने सर्व जिल्ह्यांतून सोडल्या जाणाऱ्या एसटीच्या ४ हजार विशेष बसफेऱ्या यावर्षीही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढीला भाविकांना आपापल्या घरी बसूनच मनोमन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून पंढरपूरच्या यात्रेची ओळख आहे. यावर्षी ही यात्रा ११ ते २४ जुलै यादरम्यान हाेणार हाेती. मात्र, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली. राज्यभरातील काही निवडक दिंड्यांच्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील काैंडण्यपूर येथील दिंडीचा समावेश आहे.साेलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पाेलीस आयुक्त व जिल्हा पाेलीस अधीक्षकांना पत्र पाठवून पंढरपूरकडे येणाऱ्या वाऱ्यांना परवानगी देऊ नये, विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर ११ ते २८ जुलै या काळात दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. पंढरपूर येथे पाच दिवसांची संचारबंदी लागू केली जाणार आहे, असे पत्रातून कळविले आहे. त्यानुसार गडचिराेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एसटीच्या विभाग नियंत्रकांना पत्र लिहिले असून, त्यात वारीसाठी बस उपलब्ध करून दिली जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

एसटीसाठी सर्वात माेठी यात्रापूर्व विदर्भातून पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या कमी असली, तरी हजाराे वारकरी बसने पंढरपूरला जात हाेते. पश्चिम महाराष्ट्र व साेलापूर परिसरातील आगारांच्या बस पंढरपूरच्या यात्रेसाठी साेडल्या जातात. त्यांच्याकडे असलेल्या बस कमी पडत असल्याने पूर्व विदर्भातील प्रत्येक आगारातून १० ते १५ बस आणि चालक व वाहक मागविले जात हाेते. काेराेनामुळे गेल्यावर्षी आणि यावर्षीही बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. एसटी महामंडळासाठी सर्वाधिक उत्पन्न देणारी आणि मोठी यात्रा सलग दुसऱ्या वर्षी घडत नसल्यामुळे भाविकांसह एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही हुरहुर लागली आहे.

 

टॅग्स :Pandharpurपंढरपूरstate transportएसटी