सिरोंचा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तालुका कृषी अधिकारी सिरोंचाच्या वतीने दुर्गम भागातील मंडलापूर येथे प्रयोगशील शेतकरी गुढा राजबापू यांच्या शेतात श्री पद्धतीने भात पिकाची लागवड करण्यात आली. यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओ. वाय. लांजेवार, तालुका कृषी अधिकारी धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी ढोणे, रंगधामपेठाचे कृषी सहायक एच. एस. अंकुश, मंडलापूरचे कृषी सेवक ए. व्ही. नागरबोजे, सिरकोंडाचे कृषी सेवक आर. बी. खटींग आदी उपस्थित होते. याप्रसंगी आत्माचे व्यवस्थापक लांजेवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भात पीक लागवडीच्या श्री पद्धतीचे फायदे व तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. कृषी सहायक अंकुश यांनी शेतकऱ्यांना युरिया ब्रिकेट्स वापर व हिरवळीची खते याबाबत मार्गदर्शन केले. कृषी सेवक नागरगोजे, खटिंग यांनी शेतात धान पिकाच्या श्री लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी मंडलापूर परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धान लागवडीच्या श्री पद्धतीमुळे शेतकऱ्यांना इतर पद्धतीच्या तुलनेत खर्च कमी येतो. कमी खर्चात भरघोस उत्पादन देणारी पद्धती असल्याने याचा वापर करावा, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
दुर्गम मंडलापुराच्या शेतात श्री पद्धतीने भात लागवड
By admin | Updated: February 11, 2015 02:02 IST