शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या काळात क्रीडा महोत्सव

By admin | Updated: November 22, 2014 23:01 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठांतर्गत २४ नोव्हेंबर २०१४ पासून बीए भाग १, बीएस्सी भाग १ तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या पहिले, तिसरे, पाचवे सेमिस्टर २०१४ ची हिवाळी परीक्षा होणार आहे.

खेळाडू विद्यार्थ्यांची अडचण : नियोजन व समन्वयाचा अभावगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठांतर्गत २४ नोव्हेंबर २०१४ पासून बीए भाग १, बीएस्सी भाग १ तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या पहिले, तिसरे, पाचवे सेमिस्टर २०१४ ची हिवाळी परीक्षा होणार आहे. तर १८ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ अश्वमेध क्रीडा महोत्सवाचे आयोजन २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीत अश्वमेध क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने खेळाडू विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली असून यात नियोजन व समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते.गोंडवाना विद्यापीठांतर्गत हिवाळी २०१४ च्या सेमिस्टर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबर २०१४ पासून तर २४ डिसेंबर २०१४ पर्यंत बीए भाग १, बीएस्सी भाग १ अभ्यासक्रमाची पहिल्या सत्रांची हिवाळी परीक्षा होणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांचे ८ पेपर होणार आहेत. बीएस्सी भाग २ च्या तृतीय सत्राची परीक्षा ४ ते २० डिसेंबर २०१४ दरम्यान आहे. तसेच इतरही अभ्यासक्रमाचे पहिले, तिसरे व पाचव्या सत्रांची हिवाळी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्य शासनाच्यावतीने अश्वमेध क्रीडा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा सदर क्रीडा महोत्सव २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अश्वमेध क्रीडा महोत्सवामध्ये राज्यातील २० विद्यापीठांतर्गत असलेल्या अनेक महाविद्यालयाचे मुले व मुली खेळाडू म्हणून सहभागी होणार आहेत. या क्रीडा महोत्सवात खेळाडुंना सहभागी करून घेण्याबाबत गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाला क्रीडा महोत्सव आयोजक समितीच्यावतीने पत्र पाठविण्यात आले. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाने विविध प्रकारच्या खेळांसाठी ११८ महाविद्यालयातील तब्बल १२० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. अश्वमेध क्रीडा महोत्सवात गोंडवाना विद्यापीठातर्फे मुलामुलींचे बॉस्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, मैदानी स्पर्धा व तलवारबाजी या खेळांच्या संघामध्ये १२० खेळाडुंची निवड करण्यात आली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या निवड करण्यात आलेल्या सर्व संघातील खेळाडू विद्यार्थ्यांना औरंगाबाद येथील अश्वमेध क्रीडा महोत्सवासाठी गडचिरोली येथून २५ नोव्हेंबरला खेळाडू रवाना होणार आहेत. या अश्वमेध क्रीडा महोत्सवाचा समारोप १ डिसेंबरला होणार आहे. या क्रीडा महोत्सवातील सहभागी खेळाडू २ डिसेंबरला गडचिरोलीत पोहोचणार असल्याची माहिती आहे. अनेक हुशार विद्यार्थ्यांची अश्वमेध क्रीडा महोत्सवातील संघामध्ये निवड करण्यात आली आहे. अश्वमेध क्रीडा महोत्सव व हिवाळी परीक्षा एकाच कालावधीत आल्याने अनेक विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत अनेक महाविद्यालयाच्यावतीने अश्वमेध क्रीडा महोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली असून २० नोव्हेंबरपासून खेळांचा सराव व प्रशिक्षण घेण्यात येत आहे. तोंडावर हिवाळी परीक्षा आल्या असतानाही अश्वमेध क्रीडा महोत्सवाचे पडघम वाजल्याने अनेक विद्यार्थी खेळाचा सराव करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)