शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

वाहन अधिग्रहणाला गती

By admin | Updated: September 29, 2014 00:43 IST

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने जोमात तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीनही मतदार संघात परिवहन महामंडळाच्या बसेस,

१३८ खासगी वाहने निवडणुकीसाठी लागणारगडचिरोली : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने जोमात तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीनही मतदार संघात परिवहन महामंडळाच्या बसेस, काळी-पिवळी टॅक्सी, खासगी वाहने व शासकीय वाहने मिळून एकूण ३७२ वाहने लागणार आहेत. या वाहनांच्या अधिग्रहणाच्या कार्यवाहीला गती आली आहे.भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून सदर निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याबाबतची सर्व खबरदारी प्रशासन घेत आहे. याकरीता जिल्हा निवडणूक विभागाने सुनियोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाला गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या मिळून एकूण ८६ बसेस लागणार आहेत. तसेच पोलीस विभागाला १०० बसेस लागणार आहे. प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी गडचिरोली आगाराकडे ९० बसेसची तर अहेरी आगाराकडे ९६ बसेसची मागणी केल्याची माहिती आहे. याशिवाय निवडणूक विभागाला तिनही मतदार संघासाठी जीप व काळी-पिवळी टॅक्सी यासारखी १३८ वाहने लागणार आहेत. या उपरही ५८ शासकीय वाहने निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. सदर वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहे. यात विद्युत महामंडळ, वन व आरोग्य विभागाचे वगळून अन्य सर्व विभागाच्या शासकीय वाहनांचा समावेश आहे. पोलीस विभागासाठी मतदान केंद्रांवर जवान पोहोचविण्यासाठी एकूण २५० वाहने लागणार आहेत. यात जीप ५०, मिनीट्रक १०० व महामंडळाच्या १०० बसेसचा समावेश राहणार आहे. याशिवाय पोलीस विभागाकडून दोन हेलिकॉप्टरही वापरण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान गडचिरोली मतदार संघासाठी ३२९, अहेरीसाठी २८६ व आरमोरी मतदार संघासाठी २७८ अशा एकूण ८९३ इव्हीएम मशीन लागणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी १९५ इव्हीएम मशीनचे नियोजन करण्यात आले आहे. अचानक एखाद्या इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यास तत्काळ संबंधीत मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनची व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काही इव्हीएम मशीन राखीव ठेवते. या विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली मतदार संघासाठी १७२, अहेरीसाठी १६८ व आरमोरी मतदार संघासाठी १६७ अशा एकूण ५०७ इव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.