शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

दुर्गम भागातील वाहतुकीला ‘गती’

By admin | Updated: December 11, 2014 23:07 IST

जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा व ते आत्मनिर्भर व्हावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने गडचिरोली जिल्ह्यात गती प्रकल्प सुरु केला आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा व ते आत्मनिर्भर व्हावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने गडचिरोली जिल्ह्यात गती प्रकल्प सुरु केला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील दोन महिलांसह ३८ जणांना प्रशासनाने वाहतुकीसाठी काळी-पिवळी टॅक्सी उपलब्ध करून दिली आहे. प्रशासनाच्या या अभिनव प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वाहतुकीस मदत होणार आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौ.कि.मी असून यापैकी जवळपास ७८ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. जिल्ह्यातील ८९ टक्के नागरिकांचे वास्तव्य ग्रामीण भागात असल्याने वाहतुकीच्या सोयीसुविधा या जिल्ह्यात जेमतेम आहेत. यावर मात करण्यासाठी तसेच अतिदुर्गम भागातील नागरिकांना वाहतुकीची सोय उपलब्ध होण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि बँक आॅफ इंडिया यांच्या समन्वयातून ३८ आदिवासी युवक-युवतींना वाहतुकीसाठी काळी-पिवळी टॅक्सीचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी अतिदुर्गम भागातील आदिवासी व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या लाभार्थ्यांना बाजार भावापेक्षा तब्बल एक ते दीड लक्ष रुपये कमी किमतीत या गाड्या देण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक ११ लाभार्थी सिरोंचा तालुक्यातील असून धानोरा आणि एटापल्ली तालुक्यातील प्रत्येकी ७ लाभार्थी, कोरची आणि कुरखेडा तालुक्यातील प्रत्येकी ४ लाभार्थी, अहेरी तालुक्यातील दोन लाभार्थी तर मुलचेरा, भामरागड आणि आरमोरी तालुक्यातील प्रत्येकी एका लाभार्थ्यांचा समावेश आहे.शासनाने विशेष बाब म्हणून गडचिरोली जिल्ह्यासाठी एक हजार वाहतूक परवाने मंजूर केले आहे. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत वाहनचालक प्रशिक्षक देण्यात आले. उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना वाहन परमीट, वाहन चालक परवाना व दरपत्रक उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रत्येक लाभाथ्यार्ला किमतीच्या ५० टक्के वित्तीय सहाय्य अनुदान स्वरुपात पुरविण्यात आले. तर लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान व लाभार्थी हिस्सा वगळता वाहनासाठी लागणारी उर्वरीत रक्कम जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक आॅफ इंडियामार्फत तब्बल अडीच टक्के कमी व्याज दराने मंजूर करण्यात आली आहे. बँकेमार्फत वाहन कजार्चा दर सद्यस्थितीत १२.७५ टक्के असून या प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून बँकेने १०.२५ टक्के व्याज मंजूर केले आहे. या प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात २०, दुस-या टप्प्यात १० आणि तिसऱ्या टप्प्यात ८ अशा एकूण ३८ गाड्यांचे वाटप करण्यात आले असून १३० लाभार्थ्यांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लाभार्थ्यांना देण्यात आलेली सुमो गोल्ड या गाडीची खुल्या बाजारातील किंमत ६ लक्ष २५ हजार असून गडचिरोलीतील गति प्रकल्पासाठी सदर गाडी ५ लक्ष ११ हजार रुपयांत तर गॅमा फोर्स ही ७ लक्ष रुपये किमतीची गाडी लाभार्थ्यांना ६ लक्ष ११ हजार रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना कजार्चा हप्ता सुध्दा जास्तीत जास्त ४ हजार ७०० रुपयांपर्यंतच ठेवण्यात आला आहे. दिवसाला जवळपास २०० कि.मी धावणा-या या गाड्यांच्या वाहतुकीतून चालक आणि क्लिनरला १२ ते १५ हजार रुपये प्रतिमाह मिळकत होत आहे. गडचिरोलीत शासकीय वाहतूक व्यवस्थेला नक्षली नेहमी विरोध करतात. त्यामुळे आदिवासी नागरिकांना फार मनस्ताप सहन करावा लागतो. गती प्रकल्पाने ही उणीव भरून काढली असून एकप्रकारे आदिवासी नागरिकांच्या जीवनाला जिल्हा प्रशासनामुळे गती प्राप्त झाल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)