शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लहान पऱ्ह्यांमुळे रोवणीची गती मंदच

By admin | Updated: July 8, 2016 01:36 IST

जिल्ह्यात पंधरवड्यापासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस येत आहे. उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली

कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतीक्षाच : सिंचनाची सोय असलेले शेतकरी कामाला लागले गडचिरोली : जिल्ह्यात पंधरवड्यापासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस येत आहे. उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली तसेच ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची सोय उपलब्ध होती, असे शेतकरी पंधरवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला लागले आहेत. परंतु पावसाच्या प्रतीक्षेनंतर पेरणी केलेले शेतकरी अद्यापही रोवणीच्या कामात लागलेले नाही. त्यामुळे पाऊस पडूनसुद्धा धान रोवणीची गती मंदच असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाला जिल्ह्यात सुरूवात झालेली आहे. परंतु मोजकेच शेतकरी या हंगामात व्यस्त आहेत. अनेक शेतकरी अद्यापही शेती कामाला लागलेले नाहीत. केवळ पऱ्हे व आवत्या पद्धतीने पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. जवळपास आठ दिवस शेतकऱ्यांना रोवणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर आठ दिवसांनंतरही कायम राहिल्यास रोवणी हंगामास जोर येऊ शकतो. आठ दिवसांनंतर पावसाने हुलकावणी दिल्यास रोवणी योग्य होणारे पऱ्हे रोवणीच्या कामात येणार नाहीत. याकरिता आठ दिवसांनंतरही पावसाचे सातत्य असणे गरजेचे आहे. सध्या धान रोवणीला सुरूवात झाल्यामुळे अनेक गावांत मजुरांना काम मिळाले आहे. (शहर प्रतिनिधी)नांगर व फणीचे दर वाढलेधान रोवणीला काही भागात सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना यातून मजुरी मिळत आहे. परंतु यंदा गडचिरोली उपविभागात नांगर प्रतिदिन ४०० व फण प्रतिदिन ५०० रूपये भाडे आकारले जात आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही भाड्याने नांगर अथवा फण करताना विचारच करावा लागत आहे. सध्या रोवणीची भर नसल्याने मजूरही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.