शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी उपविभागात लोह प्रकल्पासाठी मागितली जागा

By admin | Updated: November 17, 2016 02:04 IST

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर उत्खनन करून लोह प्रकल्प निर्माण करण्यासाठी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर उत्खनन करून लोह प्रकल्प निर्माण करण्यासाठी खासगी लायड्स मेटल्स कंपनीने दिना नदीच्या अलिकडे अहेरी उपविभागात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची विश्वसनिय माहिती मिळाली आहे. २००६ मध्ये लायड्स मेटल्ससह जवळजवळ १० खासगी कंपन्यांना गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड, कोरची तालुक्यात झेंडेपार आदी ठिकाणी उत्खननासाठी लिज मंजूर करण्यात आली होती. मात्र मागील १० वर्षांपासून येथे कोणतेही काम सुरू झाले नाही. लायड्स मेटल या कंपनीने २०१६ मध्ये एटापल्ली तालुक्यात उत्खननाचे काम सुरू केले आहे. मात्र स्थानिक ग्रामसभा व काही सामाजिक संघटनांचा कंपनीने येथेच उद्योग उभारावा, असा आग्रह आहे. तर काही राजकीय पक्षांनी हा प्रकल्प दिना नदीच्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लायड्स मेटल कंपनीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे दिना नदीच्या अलिकडे अहेरी उपविभागात जमीन प्रकल्प उभा करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. या भागात बहुतांशी जमीन ही वन जमीन आहे. ती जमीन घेताना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. या सर्व तांत्रिक मंजुरी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारकडून मिळवून द्यावा व जमिनही मिळवून द्यावी. त्याचा मोबदला कंपनी देईल, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ती मिळू शकली नाही. मात्र कंपनीने अहेरी उपविभागात प्रकल्प उभा करण्याबाबत आता ठोस भूमिका घेतली असल्याचे समजते. या कंपनीच्या उत्खनन कामाला एटापल्ली तालुक्यातील काही ग्रामसभांनी विरोध केला आहे. मात्र हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच होईल, अशी भूमिका पालकमंत्र्यांसह अनेकांनी यापूर्वीही घेतली आहे. शिवाय या भागात रेल्वे मार्गही नेला जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात भविष्यात लोहखनिज प्रकल्प उभा राहण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन कंपनीच्या या पत्रावर आता काय भूमिका घेते हे महत्त्वाचे राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)