शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धान पिकाची लागवड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 02:05 IST

शासकीय योजनेतून चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात सिंचन सुविधा झाल्याने उन्हाळी धान पिकाची लागवड आता वाढली आहे.

शेतशिवार हिरवेगार : चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात दुबार धान पीक चामोर्शी : शासकीय योजनेतून चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात सिंचन सुविधा झाल्याने उन्हाळी धान पिकाची लागवड आता वाढली आहे. चामोर्शी तालुक्यात उन्हाळी धानपीक चांगले बहरले असून ते हिरवेगार दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून उन्हाळी धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र जवळपास दोन हजार हेक्टर आहे. विशेष म्हणजे, सिरोंचा व चामोर्शी तालुक्यात तसेच वैरागड परिसरात उन्हाळी धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. चामोर्शी तालुक्यातील शेतकरी हलक्या व जड प्रतीच्या धानाचे उत्पादन घेत असतात. चामोर्शी तालुका मुख्यालयापासून आष्टीकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या शेतशिवारात शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. धान रोवणीची कामे आटोपली असून शेत शिवार आता हिरवेगार दिसत आहे. धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने शेतकरी दुबार पिकांकडे वळले आहेत. चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हलक्या व संकरीत वाणाची धान लागवड शेतात केली आहे. सदर उन्हाळी धान पिकाचे उत्पादन मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे. चामोर्शी व सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली असून शेकडो हेक्टर क्षेत्रावर धान पीक बहरले आहे. पिकामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारत आहे. (शहर प्रतिनिधी)