शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बांधावरील लोकगीताचे स्वर लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:31 IST

‘चंदन गडचा राजा चंदन, पत्नी त्याची आंबाबाई व कन्या त्याची आंबिल, कन्या त्याची नागवल’ अशा प्रकारच्या लोकगीतात एखाद्या पौराणिक,

ग्रामीण साज हरविला : घड्याळीच्या काट्यावर असतात मजुरांच्या नजराप्रदीप बोडणे । लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ‘चंदन गडचा राजा चंदन, पत्नी त्याची आंबाबाई व कन्या त्याची आंबिल, कन्या त्याची नागवल’ अशा प्रकारच्या लोकगीतात एखाद्या पौराणिक, काल्पनिक कथेचा आधार घेऊन त्यालाच स्वर गुंफत नेऊन ही कथा शेताच्या बांधावर रोवणीचे काम करताना अनेक महिला व्यस्त दिसून येत होत्या. मनोरंजनासोबतच श्रम परिहार करणे आणि सत्व व तत्त्व जपणाऱ्या या काल्पनीक कथा वास्तव जीवनात अनुसरण करणे, असा या लोककथा व लोकगिताचा ग्रामीण समाजात महत्त्वाचे स्थान होते. पण अलिकडे शेतीच्या बांधावरील लोकगिताचे स्वर आता लुप्त झाले आहेत. परिणामी ग्रामीण जीवनाचा साद हरविला आहे. पूर्व विदर्भातील धान पट्ट्याच्या भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात खरीपाच्या धान रोवणीच्या वेळी या लोकगिताची धूम चालायची. एकदा महिला रोवणीसाठी शेत जमिनीत उतरल्या की, पूर्व परंपरेने चालत आलेल्या गीताचा सूर धरायच्या आणि इतरांनी त्याला प्रतिसाद द्यायचा. त्यातही आपले हे श्रम परमेश्वराच्या चरणी अर्पण करते, असा आशय बऱ्याच लोकगितातून स्पष्ट होत असतो.‘ऐवढा रोवणा रोवलो भोलेनाथा, तुझा सवभुई ऐवढा रोवणा रोवलो धरणीमाये तुझ्या सवभुई’ आपल्या अंगी निर्माण होणार बळ परमेश्वराच्या कृपेने निर्माण होते. करविता धनी तो ईश्वर आहे. आपण निमित्त मात्र असे गुणगाण करताना या लोकगितातून तत्कालीन लोकजीवनाचे दर्शनही घडते. आधुनिकतेच्या नावाखाली बरेच बदल झाले. खिल्लाऱ्या बैलाच्या जोडीच्या गळ्यातील घुंगराच्या मधूर स्वराऐवजी ट्रॅक्टरचा कर्कश आवाज शेतात घुमत आहे. लोकगिताच्या तालात मग्न असलेल्या मजुरांना पूर्वेचा सूर्य पश्चिमेला कधी गेला हे कळायचे नाही. आता मजुरांच्या नजरा घड्याळीच्या काट्यावर असतात.