इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड प्राप्त : जागतिक स्तरावर प्रकल्पाचे सादरीकरण गडचिरोली : येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेला मुंबई येथे झालेल्या समारंभात इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार प्राचार्य उषा रामलिंगम यांनी स्वीकारला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सात प्रकल्पावर काम करून सदर पुरस्कार मिळविला आहे. तीन प्रकल्पामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीलंका या देशातील शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘मनी ईज द मायटेस्ट’, आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘टॉप युवर पील’, इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनी ‘मीडिया मेनिया’ हा प्रकल्प सादर केला. सदर प्रकल्पांतर्गत स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी श्रीलंकेच्या विद्यार्थ्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारा संवाद साधला. वेगवेगळ्या प्रकल्पामधून एसओएसच्या विद्यार्थ्यांचा अनेक देशांच्या संस्कृतीशी परिचय झाला. यामध्ये ग्रेड ब्रिटन, रशिया, चीन, कोरिया, न्यूझीलंड, जपान, थायलंड, यूएसए, अरब, अमीराती, मेक्सिको, जर्मनी, अर्जेटिना, फ्रान्स, स्पेन, इटली, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, ग्रीस, आॅस्ट्रेलिया आदी देशांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला एसओएसच्या प्राचार्य उषा रामलिंगम व प्रकल्प समन्वयक तपोती गयाली उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
एसओएस पुरस्काराने सन्मानित
By admin | Updated: January 25, 2017 02:07 IST