शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांच्या समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावा, अशी मागणी पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांच्या समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावा, अशी मागणी पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी देण्यात येते. मात्र सातव्या वेतन आयोगामध्ये चटोपाध्याय व एकस्तर असे वेगळे निकष लावले आहेत. चटोपाध्याय वेतन श्रेणीधारक शिक्षकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना सरसकट एकस्तर वेतनश्रेणी लावावी. २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन लागू करण्याबाबत सरकारने विचार करावा. पहिली ते सातवीच्या शाळांना अट न घालता मुख्याध्यापक पद लागू करावे. रिक्त पदे भरावी. जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल शासनामार्फत भरावे. विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीचा शासन निर्णय रद्द करावा. आॅनलाईन कामासाठी केंद्रावर डाटाएन्ट्री आॅपरेटरची नेमणूक करावी. निधीअभावी अर्धवट राहिलेल्या शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी निधी द्यावा. शालेय पोषण आहार, बांधकाम आदी कामे शिक्षकांकडून काढून घ्यावी, आदी मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले.यावेळी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, सरचिटणिस आशिष धात्रक, सहसरचिटणिस सुरेश पालवे, जेष्ठ नेते प्रमोद कावडकर, राज्य प्रतिनिधी श्रीकांत कुथे, प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था चामोर्शीचे अध्यक्ष राजेश दुधबावरे, उपाध्यक्ष अशोक बोरकुटे, कोषाध्यक्ष लोमेश उंदीरवाडे, गडचिरोली अध्यक्ष धनेश कुकडे, वडसा अध्यक्ष शत्रुघ्न झुरे, मुलचेरा अध्यक्ष गोपाल डे,चामोर्शी अध्यक्ष किशोर कोहळे, सरचिटणिस मारोती वनकर, दामोधर बामनवाडे, जनार्धन म्हशाखेत्री, शंकरराव सुरजागडे, गडचिरोली सहसरचिटणिस वाय.एस तांदळे, सी.आर.राठोड, गुरुदास सोमनकर, दिगांबर देवकते, जी.व्ही.बिडकर, पी.डी.चव्हाण, सुधाकर दुधबळे, जिल्हा उपाध्यक्ष मुर्लीधर सातपुते, अशोक रायसिडाम, मुलचेरा सरचिटणिस सुरेश बडगे, चामोर्शी युवा आघाडी अध्यक्ष सुजित दास, जिल्हा सल्लागार सिताराम भोयर, हेमंत चावरे, देवनाथ बोबाटे, दुर्गम शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कुरवटकर, पुरुषोत्तम माडे, चामोर्शी प्रसिद्धी प्रमुख ऋषीदेव कुनघाडकर, गोरखनाथ तांदळे, नारायण मल्लीक, जगदिश मल्लीक, विजय मल्लीक, महितोष मंडल, चामोर्शी सहसरचिटणिस महादेव डे, कार्याध्यक्ष सिद्धार्थ सोरते, जितेंद्र रायपुरे, शंकरराव सातपुते,अशोक पोटावी, सुनिल सातपुते, संदिप ऐलावार, उत्तम कोसे, दिलीप बुरांडे, धानोरा सहसरचिटणिस अशोक पाळवदे, बंडु मोहुर्ले, भिकारु घोडाम, सिडाम आदी शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.