शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: June 13, 2017 00:45 IST

नगर परिषदेतील रोजंदारी, कंत्राटी कामगार तसेच सफाई कामगारांच्या विविध समस्या सोडवाव्या,

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषदेतील रोजंदारी, कंत्राटी कामगार तसेच सफाई कामगारांच्या विविध समस्या सोडवाव्या, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात नगराध्यक्षांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात, नगर परिषदेतील आकृतीबंधानुसार लोकसंख्येच्या आधारे ३० सफाई कामगारांची पदे मंजूर आहेत. सध्या शहरातील लोकसंख्या वाढ झाली असून सफाई कामगार त्या तुलनेत कमी पडत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ५४ हजार १५२ एवढी लोकसंख्या गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात आहे. आकृतीबंधानुसार १ हजार लोकसंख्येच्या मागे एक सफाई कामगार असणे आवश्यक आहे. त्यानुसार २४ नवीन सफाई कामगारांची पदनिर्मिती करून सदर पदे भरावी, नगर परिषदेत कार्यरत सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांना पदोन्नती द्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेच्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या पात्र वारसदारांना मालकी तत्त्वावर सदनिका मिळवून द्यावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामगार आयुक्तांच्या निर्देशानुसार मंजूर ८ हजार ४३८ रूपये प्रतिमाह वेतन द्यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ईपीएफ संदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी, रोजंदारी, कंत्राटी सफाई कामगारांचे आर्थिक, शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने त्यांच्या समस्यांचा विचार करून समस्या सोडवाव्या, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन महातो व सफाई कामगार संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.