शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल, पुलाची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:08 IST

तालुक्यातील कासवी ग्रामपंचायतीने गरजू कुटुंबीयांना घरकूल मिळण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेतला. मात्र शासन व प्रशासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कासवीवासीय जिल्हा कचेरीवर धडकले

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील कासवी ग्रामपंचायतीने गरजू कुटुंबीयांना घरकूल मिळण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेतला. मात्र शासन व प्रशासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले नाही. याशिवाय कासवी-पळसगाव मार्गावरील गाढवी नदीवर पूल नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शिवाय या भागात आरोग्याची समस्याही ऐरणीवर आली आहे. या मूलभूत समस्या मार्गी लावाव्या, या मागणीसाठी कासवीवासीय गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांना भेटून त्यांना निवेदन सादर केले. तसेच समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चाही केली. यावेळी कासवीचे माजी उपसरपंच प्रवीण रहाटे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. निवेदनावर कीर्तीलाल मेश्राम, प्रकाश गुरनुले, अनिता मडगाम, मंगेश मरस्कोल्हे, वनीता राऊत, सुनील पुराम, सुनीता गळे, सुनील मडावी, इंदिरा ढोरे, रितेश सडमाके, शेवंता गेडाम, रामदास उईके, अनिल शेंद्रे, दीपक दुपारे, स्वप्नील गुरनुले, क्रिष्णा मट्टे, ईश्वर गुरनुले, निकेश उईके, बाजीराव सयाम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.आदिवासींना शबरी घरकूल योजनेअंतर्गत घरकूल देण्यात यावे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागासवर्गींना घरकूल देण्यात यावे, कासवी ते पळसगाव मार्गावरील गाढवी नदीवर पूल बांधण्यात यावा, कासवी येथे डीपी बदलवून देण्यात यावी, तसेच कासवी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माण करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. गावात अनेक बीपीएलधारक गरजू लाभार्थ्यांकडे वास्तव्यासाठी पक्के घर नाही. तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही, असे म्हटले आहे.जुन्या डीपीने बत्ती गूलकासवी येथे गेल्या अनेक वर्षांपासूनची जुनी डीपी कायम आहे. पावसाळ्यात येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागते. सातत्याने मागणी करूनही महावितरणने डीपी बदलवून दिली नाही.