गडचिराेली : गाेंडवाना विद्यापीठांतर्गत विद्यार्थी व शिक्षणविषयक समस्यांसह अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी पक्ष व संघटनांनी गुरुवारी (दि.४) उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
गाेंडवाना विद्यापीठासह विद्यार्थी व शिक्षणविषयक समस्या साेडवाव्यात, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली. गाेंडवाना विद्यापीठाची निर्मिती हाेऊन १० वर्षांचा कालावधी उलटला; परंतु येथील समस्या सुटल्या नाहीत. गाेंडवाना विद्यापीठात आदिवासी संग्रहालय व पुराभि लेखागार सुरू करावे, तसेच आदिवासी संशाेधन केंद्र उभारावे. नवीन शिक्षण धाेरण लागू करू नये, विद्यापीठाच्या विविध मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन बंद करावे व निवडणूक घ्यावी. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र व स्त्री अभ्यास केंद्र सुरू करावे, प्राध्यापक पदभरती केंद्रीय पद्धतीने करावी, पीएच.डी. नाेंदणी शुल्क ५०० रुपये घ्यावे. नवीन वसतिगृह निर्माण करावे, वसतिगृह प्रवेश वार्षिक शुल्क १०० रुपये ठेवावे, विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका याेजनेंतर्गत मागेल त्याला काम आणि कामाचे दाम १५० रुपये तास अशा पद्धतीने दरराेज दाेन तास काम याप्रमाणे याेजना राबवावी आदी मागण्यांचा समावेश हाेता. निवेदन देताना बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष राज बन्साेड व पदाधिकारी उपस्थित हाेते.
बाॅक्स ......
अनुदानित काॅलेजमधील रिक्त पदे भरा
राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील रिक्त असलेली सहायक प्राध्यापकांची संपूर्ण पदे भरावी, अशी मागणी प्राध्यापक संघटनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महाविद्यालयातील पदभरती करताना २०० पाॅइंट बिंदुनामावली लागू करावी व पारदर्शक केंद्रीय पद्धतीने पदे भरावीत, अशी मागणी संघटनेने ना. सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अविनाश भुरसे, राेशन नासरे, अमरीश उराडे, सचिन बाेधाने, संपदा पायाळ, राेशना म्हस्के, दिगंबर पिपरे उपस्थित हाेते.