शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सौर कंदील व सायकलींचे वाटपच नाही

By admin | Updated: June 9, 2017 01:01 IST

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील शालेय विद्यार्थिनींना सायकली आणि आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सौर कंदीलांचे वाटप

निधी मिळूनही खर्च नाही : जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाचा कारभारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील शालेय विद्यार्थिनींना सायकली आणि आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सौर कंदीलांचे वाटप करण्यासाठी वर्ष २०६-१७ मध्ये २२ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली होती. मात्र जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या उदासीन कारभारामुळे वर्षभरात एक दमडीही खर्च करण्यात आली नाही. याशिवाय या विभागाच्या इतर योजनाही वर्षभरात चांगल्याच रखडल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात गेल्या वर्षभरापासून चांगलेच गोंधळाचे वातावरण आहे. अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे कोणाचा पायपोस कोणात नाही. यामुळे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी स्थिती दिसून येत आहे. विशेष घटक योजना आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत या विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी वर्ष २०१६-१७ करिता ४४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यात विशेष घटक योजनेअंतर्गत महिला मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी ४.५० लाखांची तरतूद होती. त्यातून १०३ लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यावर ३.६० लाखांचा खर्च झाला. मात्र साधी टायपिंग व संगणक टायपिंग प्रशिक्षणासाठी असलेल्या ४.५० लाखांच्या तरतुदीतून एक रुपयाही खर्च झाला नाही.याशिवाय याच विशेष घटक योजनेअंतर्गत मुलींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण देण्यासाठी १ लाख, इयत्ता ५ ते १२ मध्ये शिकणाऱ्या मुलींना शाळेत येण्याजाण्यासाठी सायकलींचे वाटप करायचे होते. त्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद होती. मात्र वर्षभरात एकाही मुलीला सायकल दिली नाही. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सौर कंदील पुरविण्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद असताना कोणालाही हे कंदील दिले नाही.आदिवासी उपयोजनेअंतर्गत वरीलप्रमाणेच योजनांसाठी २५ लाखांची तरतूद होती. त्यात महिला व मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी ४ लाख रुपये मिळाले असताना केवळ २.१६ लाखांच्या खर्चातून ६२ लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले. संगणक व साध्या टायपिंग प्रशिक्षणासाठी ३.५ लाखांची तरतूद असताना याचा लाभ कोणालाही दिला नाही. इयत्ता ५ ते १२ मधील मुलींना सायकलींचे वाटप करण्यासाठी ६.५० लाख मिळाले होते. मात्र कोणालाही सायकल दिली नाही. एवढेच नाही तर आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सौर कंदील देण्यासाठी ६ लाखांची तरतूद असताना कोणालाही कंदील मिळाला नाही.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर झालेला निधी दोन वर्षे वापरता येत असल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात अखर्चित राहिलेला या योजनांमधील निधी चालू आर्थिक वर्षात वापरता येईल. मात्र त्यावेळी वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना यावर्षी लाभ मिळण्याची संधी गमवावी लागू शकते. सायकल वाटपाच्या योजनेत २० इंची लेडीज सायकलसाठी ३३०० रुपये दर तर सौर कंदील खरेदीसाठी १९३५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वत:च खरेदी करून नंतर बिल सादर करायचे आहे. ती रक्कम नंतर त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. नवीन आर्थिक वर्षात तरी या योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळेल याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा केली जात आहे. लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरावरआदिवासी उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या तर विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याना योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करताना तो दारिद्र्य रेषेखालील असावा. तो लाभार्थी न मिळाल्यास कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५० हजाराच्या आत असावे. ही निवड तालुकास्तरावर असणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना करायची आहे.