शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेवरील योजनेने पाणीटंचाईतून मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड नगर पंचायतीच्या हद्दीत बेजूर वस्ती आहे. या वस्तीपर्यंत तत्कालीन भामरागड ग्रामपंचायतीची नळ योजना पोहोचली नव्हती. शिवाय बेजूर भागात सार्वजनिक विहिरी व हातपंपाची संख्या अत्यल्प आहे. तसेच दरवर्षीच्या उन्हाळ्यात या भागात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होत होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन ...

ठळक मुद्देबेजुरवासीयांना दिलासा : नगर पंचायतीतर्फे दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड नगर पंचायतीच्या हद्दीत बेजूर वस्ती आहे. या वस्तीपर्यंत तत्कालीन भामरागड ग्रामपंचायतीची नळ योजना पोहोचली नव्हती. शिवाय बेजूर भागात सार्वजनिक विहिरी व हातपंपाची संख्या अत्यल्प आहे. तसेच दरवर्षीच्या उन्हाळ्यात या भागात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होत होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन भामरागड नगर पंचायत प्रशासनाने बेजूर भागात सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित केली. त्यामुळे आता येथील नळांना दिवसभर पाणी येत आहे. परिणामी बेजूर भागातील नागरिकांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सन २०१०-११ पासून अनेक दुर्गम व लहान गावांमध्ये पाणी सुविधेसाठी सौरऊर्जेवर चालणारी दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करण्यात सुरुवात झाली. मोठ्या नळ योजनेच्या तुलनेत सदर दुहेरी पंप योजना कार्यान्वित करण्यास अत्यल्प खर्च येतो. तसेच देखभालीचा खर्चही अत्यल्प असतो. वीज बिलाचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे दुर्गम व छोट्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या गावांमधून अशा प्रकारच्या सौरऊर्जेवरील दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करणे अत्यंत सोयीचे ठरते. भामरागड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष राजू वड्डे व बांधकाम सभापतीच्या पुढाकाराने बेजूर भागात सौरऊर्जेवरील दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे राष्टÑीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत बेजूर भागात सौरऊर्जेवर चालणारी ही नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून आता या भागातील महिलांना नळाचे पाणी दिवसभर उपलब्ध होत आहे. परिणामी उन्हाळ्यात जाणवणारी हातपंपावरील गर्दीचे दृश्य आता दिसणार नाही.नेलगुंडा, बोटनफुंडीतही पाणी सुविधा४भामरागड पंचायत समितीअंतर्गत नेलगुंडा, बोटनफुंडी या लहान गावांमध्ये सौरऊर्जेवर चालणारी दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असतानाही या योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत आहे. इतर ग्रामपंचायतींनी अशा योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे.