शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पडताळणी समितीविरोधात माना समाज आंदोलन करणार

By admin | Updated: March 12, 2017 01:57 IST

येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती माना समाजाच्या नागरिक व विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणीचे दावे

जमात प्रमाणपत्र पडताळणीस विलंब : माना आदिम जमात मंडळाचा इशारा गडचिरोली : येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती माना समाजाच्या नागरिक व विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणीचे दावे जाणूनबुजून प्रलंबित ठेवत आहे. यामुळे अनेक युवकांना आपली नोकरी गमवावी लागत आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती विरोधात माना आदिम जमात मंडळाच्या वतीने मे महिन्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेतून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. माना जमाती आदिवासी जमात असून स्वातंत्र्यपूर्व १८६९ मध्ये तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रथम सेटलमेंट रिपोर्टमध्ये मेजर लुसी स्मीथ यांनी माना आदिवासी जमातीची लोकसंख्या २९ हजार १७५ असल्याची नोंद केली आहे. त्यानंतर १९५६ साली माना जमातीची नोंद घटनेच्या ३४२ व्या कलमानुसार घेण्यात आली. माना जमातीला वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय ६ आॅक्टोबर २००६ व ७ आॅक्टोबर २००६ ला आदेश निर्गमित करून माना जमातीला जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे सर्वाेच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मात्र गडचिरोली येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती राजकीय दबावात काम करीत आहे. २०११ पासून माना समाजाच्या नागरिकांचे प्रमाणपत्र पडताळणीचे दावे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तसेच युवकांना नोकरीपासूनही वंचित राहावे लागत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही हणन होत आहे. त्यामुळे पडताळणी समितीच्या विरोधात मे महिन्यापासून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. गोंडवाना स्टुडंट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी माना जमातीवर बोगस असल्याचा आरोप केला आहे. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर माना जमातीला सर्वोच्च न्यायालयाने वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गोंडवाना स्टुडंट युनियनला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तसेच माना समाजाच्या विरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. गोंडवाना स्टुडंट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी माना समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा संघटनेचे सचिव वामन सावसाकडे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला अध्यक्ष शत्रुघ्न चौधरी, अ‍ॅड. वामन नन्नावरे, मधुकर केदार, राजन हिरे, रमेश राणे, गोपाल मगरे, दीपक घोडमारे, भाऊराव घोडमारे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)