शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तर आम्ही 'प्रधानमंत्री जनमन' कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 14:28 IST

मार्गाची दुरुस्ती करावी : पोटेगावातील नागरिकांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली- पोटेगाव मार्गाची सध्या दुरवस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करताना परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशातच पोटेगाव येथे १० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री जन मन कार्यक्रम नियोजित आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने या रस्त्याची दुरस्ती करावी, अन्यथा पोटेगाव परिसरातील नागरिक सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला.

जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोटेगाव ते गडचिरोली हा ३० किमी अंतराचा रस्ता आहे. गडचिरोली ते गुरवळापर्यंत हा स्ता व्यवस्थित आहे. पुढे या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत. हा मार्ग जंगलातून गेलेला असल्याने रस्त्यात वाहन बंद पडल्यास रानटी प्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर मार्गाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. जिल्हा परिषद सीईओ आयुषी सिंह यांना निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ विभाग गडचिरोली युवा जिल्हा अध्यक्ष विनोद मडावी, धनराज दामले, रामदास शेरकी, पी. के. मडावी, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड, किरण भनारे, अंकुश कोकोडे, चामोर्शीचे अध्यक्ष सोनू कुमरे यांनी केली.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकही त्रस्त पोटेगाव मार्गाने मानव विकास मिशनच्या बसेस धावतात. विद्यार्थ्यांसाठी धावणाऱ्या बसेससुद्धा रस्त्यात बंद पडत आहेत. एटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी या भागातील रुग्ण याच मार्गाने गडचिरोली येथे येतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा रुग्णवाहिकासुद्धा बंद पडतात. याच भागात गुरवळा जंगल सफारी व मुतनूर पहाडी हे पर्यटन स्थळ आहे. या भागात पर्यटकांचा ओढा असतो.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली