शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरिप हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यात 82 काेटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

आधुनिक पद्धतीने शेती करताना पीक लागवडीचा खर्च माेठ्या प्रमाणात वाढला आहे. एवढा पैसा शेतकऱ्याजवळ राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नव्हता. अनेक शेतकरी सावकाराकडून लुबाडले जात हाेते. शेतीत पिकलेले उत्पन्न सावकारालाच द्यावे लागत हाेते. ही बाब ओळखून शासनाने शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे असे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देउद्दिष्टाच्या केवळ ४५ वितरण, शेती मशागतीचा खर्च वाढला

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील १८ हजार ६१९ शेतकऱ्यांना बँकांमार्फत ८२ काेटी ४५ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. बँकांना १८४ काेटी २४ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. उद्दिष्टाचा विचार करता केवळ ४४.७५ टक्के कर्ज वितरण झाले आहे. आधुनिक पद्धतीने शेती करताना पीक लागवडीचा खर्च माेठ्या प्रमाणात वाढला आहे. एवढा पैसा शेतकऱ्याजवळ राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नव्हता. अनेक शेतकरी सावकाराकडून लुबाडले जात हाेते. शेतीत पिकलेले उत्पन्न सावकारालाच द्यावे लागत हाेते. ही बाब ओळखून शासनाने शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्टही देण्यात आले आहे; मात्र बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना हात आखडता घेत असल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बँकांनी केवळ उद्दिष्टाच्या ४५.७५ टक्केच कर्ज वितरण केले आहे. 

सहकारी बँकेचा वाटा ६१ टक्के जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात एकूण ५१ शाखा आहेत. यातील बहुतांश शाखा ग्रामीण भागात  कार्यरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची नाळ या बँकेसाेबत जाेडली आहे. परिणामी बहुतांश शेतकरी याचा बँकेमधून कर्ज घेण्यासाठी प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावर्षीच्या खरीप हंगामात १३ हजार ५६४ शेतकऱ्यांना सुमारे ५० काेटी २६ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.  जिल्ह्यातील एकूण बँकांच्या कर्ज वितरणाच्या हे प्रमाण ६१ टक्के एवढे आहे. विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वितरणात नेहमीच आघाडीवर राहते. 

दुर्गम भागातील शेतकरी कर्जाच्या याेजनेपासून अनभिज्ञ

- पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी केल्यास कर्जावरील व्याज माफ केले जाते. म्हणजेच शेतकऱ्याला केवळ कर्जाची मुद्दल भरावी लागते;मात्र दुर्गम भागातील अनेक शेतकऱ्यांना या  याेजनेची माहिती नाही. त्यामुळे शेतकरी बचत गटाकडूनच कर्ज घेत असल्याचे दिसून येते. बचत गटाचेही व्याज अधिक राहते.

- जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत बँकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यातही एटापल्ली, भामरागड, सिराेंचा, काेरची या तालुक्यांमध्ये तर बँकांची संख्या केवळ दाेन ते तीन आहे. ५० किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्याला कर्जासाठी बँकेत जाणे परवडत नाही. अनेकांना बँकांचे व्यवहारही माहीत नाही.त्यामुळे ते पीककर्ज घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज