शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधार्‍यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

आतापर्यंत १३ हजार नागरिकांनी काेराेनाला हरवून दाखवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

मागील वर्षभराच्या कालावधीत सुमारे १८ हजार ४ नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. सरकारमार्फत विविध उपाय याेजले जात असले तरी मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, तसेच काेराेनामुळे ३११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काेराेनाशी संबंधित चर्चा करताना नागरिक प्रामुख्याने नकारात्मक असलेल्या बाबींवरच जास्त बाेलतात. त्यामुळे ऐकणाऱ्याला काेराेना हा महाभयंकर राेग आहे.

ठळक मुद्देसकारात्मक विचारातून मात करणे शक्य

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी सुमारे १३ हजार ३७५ नागरिक काेराेनाला हरवून काेराेनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे एकूण बाधितांच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे ७४.२९ टक्के एवढे आहे. या आकड्यांकडे लक्ष घातल्यास काेराेनाला हरविणे सहज शक्य असल्याचे दिसून येते. मागील वर्षभराच्या कालावधीत सुमारे १८ हजार ४ नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. सरकारमार्फत विविध उपाय याेजले जात असले तरी मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, तसेच काेराेनामुळे ३११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काेराेनाशी संबंधित चर्चा करताना नागरिक प्रामुख्याने नकारात्मक असलेल्या बाबींवरच जास्त बाेलतात. त्यामुळे ऐकणाऱ्याला काेराेना हा महाभयंकर राेग आहे. ताे झाल्यास मृत्यू अटळ आहे, असा गैरसमज निर्माण हाेऊन अनावश्यक भीती निर्माण हाेते. मात्र, काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांचे हे प्रमाण बाधितांच्या तुलनेत केवळ १.७३ टक्का एवढे आहे. म्हणजेच जवळपास ९८ टक्के नागरिकांनी काेराेनावर मात केली आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मृत्यू झालेल्यांपैकी काही रुग्णांनी सुरुवातीलाच उपचार केला नाही. अगदी शेवटच्या स्टेजवर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याने डाॅक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केल्यावरही त्याला वाचविता आले नाही किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांचाच मृत्यू झाल्याचे दिसून येते. 

घाबरू नका, काेराेनाला आम्हीही हरविले

काेराेना हाेणार नाही, याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. तरीही काेराेनाची लागण झाल्यास वेळीच तपासणी करून रुग्णालयात दाखल हाेणे आवश्यक आहे. लवकर उपचार सुरू झाल्यास काेराेनाचा काहीच त्रास हाेत नाही. कृत्रिम ऑक्सिजनचीही गरज पडत नाही. -एकनाथ गेडाम, ज्येष्ठ नागरिक 

समाजात काेराेनाविषयी नकारात्मक विचार पसरविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या राेगाविषयी अनावश्यक भीती निर्माण झाली आहे. मी स्वत: ६१ वर्षांचा आहे. मात्र, उपचारादरम्यान मला ऑक्सिजनची गरजच भासली नाही. डाॅक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे मी काेराेनातून पूर्णपणे बरा झालाे आहे. -देवाजी चापले, ज्येष्ठ नागरिक

काेराेनामुळे सर्वच रुग्ण गंभीर राहत नाहीत. मी स्वत: घरीच राहून उपचार घेतला आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर मी उपचार घेत हाेताे. मला थाेडा सर्दी, खाेकला हाेता. काेराेनाची चाचणी केल्यावर अहवाल पाॅझिटिव्ह आला. चार दिवसांतच सर्दी, खाेकल्याचा त्रास कमी झाला. -शिवराम मांदाडे, काेराेनामुक्त नागरिक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या