शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोंढाळाच्या नदीपात्रातून रेतीची तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

महसूल बुडत असूनही महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचे दरवर्षी लिलाव होऊन लाखो, करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती तस्कर मालामाल होत आहेत.

ठळक मुद्देप्रशासन सुस्त, महसूल विभागाने खोदलेले खड्डे रेती चोरट्यांनी बुजवले

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरुड : देसाईगंजवरून किमी अंतरावर असलेल्या कोंढाळा वैनगंगा नदीपात्रातून रेती चोरीला जाऊ नये तसेच ट्रॅक्टर नेता येऊ नये  म्हणून महसूल विभागाने   रेती घाटावर व नदी पात्रात खड्डे खोदून ठेवले होते.  रेती चोरट्यांनी हे खड्डे बुजविले. त्यानंतर येथून रस्ता करून रेती तस्करी सुरू केली आहे. ट्रॅक्टरद्वारे व इतर साधनांद्वारे रेतीचा अवैधरित्या उपसा केला जात असल्याने महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल बुडत असूनही महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचे दरवर्षी लिलाव होऊन लाखो, करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. कोंढाळा गावानजीकच वैनगंगा नदी आहे. गावानजीक वैनगंगा नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा घेत काही ट्रॅक्टरधारक नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहे.  रेतीच्या उपशामुळे नदी पात्र खोलगट स्तरापर्यंत पोहोचले आहे. शेकडो ते हजारो ब्रास रेतीचा उपसा यापूर्वी झाला व सद्यस्थितीत सुरूच आहे. ट्रॅक्टरधारकांचे सर्वत्र धागेदोरे व जाळे पसरले असल्याने मोबाईलद्वारे सर्वत्र संपर्क करून इकडे-तिकडे हालहवाला घेतला जातो. रेतीचा अवैधरित्या उपसा केला जातो. रात्री १२ वाजल्यानंतरचा कालावधी रेती चोरांसाठी फलदायी असल्याचे कळते. लाखो रुपयांचा दंड आकारूनही दंडाला न जुमानता चलती का नाम गाडी असे चित्र निर्माण झाले आहे. रेती चोरीचे प्रकरण होऊ नये, यासाठी आणखी काही बदल करून रेती तस्करीला कसा आळा घालता येईल, याबाबत शासनस्तरावरून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

इमारत व घर बांधकामे जाेमातदेसाईगंज तालुक्यात शासनाच्या विविध घरकूल याेजनेतून शहरी व ग्रामीण भागातील कुुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले आहे. रेतीच्या तुटवड्यामुळे मध्यंतरीच्या कालावधीत घरकुलाचे काम ठप्प पडले हाेते. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून तस्करीच्या माध्यमातून रेती खरेदीसाठी उपलब्ध हाेत आहे. ही रेती खरेदी करून घरकूल व इतर इमारत बांधकामे केली जात आहेत.

 

टॅग्स :sandवाळू