शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

१२ ग्रामपंचायती झाल्या ‘स्मार्ट’

By admin | Updated: June 12, 2017 00:54 IST

शासनातर्फे सन २०१६-१७ या वर्षाकरिता ‘स्मार्ट ग्राम’ योजना राबविण्यात आली. या योजनेत

स्मार्ट ग्राम योजना : सर्वाधिक गुण मार्कंडादेव ग्रा.पं.लादिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनातर्फे सन २०१६-१७ या वर्षाकरिता ‘स्मार्ट ग्राम’ योजना राबविण्यात आली. या योजनेत जिल्हाभरातील ५० वर ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यापैकी निकष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती स्मार्ट ग्राम म्हणून जाहीर झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी प्रत्येकी १० लाख रूपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळणार आहे.सन २०१०-११ पासून राज्य सरकारतर्फे पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यातील काही निवडक ग्रामपंचायती सहभागी होत होत्या. त्यानंतर सदर योजनेच्या अंमलबजावणी व निकषात राज्य शासनाने फेरबदल केले व त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१६ च्या ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रूपांतर स्मार्ट ग्राम योजनेत केले. तेव्हापासून या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. या योजनेत गावांची विभागणी करण्यात आली. यामध्ये ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायती तसेच उर्वरित ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत गावातील स्वच्छतेवर २० गुण, व्यवस्थापनेवर २० गुण, दायित्वासाठी २०, अपारंपारीक ऊर्जा व पर्यावरणासाठी २० तसेच पारदर्शकता व तंत्रज्ञानासाठी १५ असे एकूण १०० गुण ठेवण्यात आले होते. सदर योजनेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय समितीमार्फत फेब्रुवारी ते मार्च महिन्यात मुल्यांकन करण्यात आले होते. ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुण देण्यात आले. त्यानुसार जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार व समितीच्या निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम म्हणून निवड झाली आहे. यामध्ये मार्र्कंडादेव, तुळशी, वघाडा, जांभळी, कालिनगर, रामंजापूर, जारावंडी, बोदालदंड, वाकडी, महागाव खुर्द, जांभूळखेडा व आरेवाडा आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींना राज्य शासनातर्फे द्यावयाचा प्रत्येकी १० लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषद शासनाकडे प्राप्त झाला असल्याची माहिती मिळाली आहे. जि.प. प्रशासनातर्फे लवकरच या ग्रामपंचायतींना निधी अदा करण्यात येणार आहे. स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीमध्ये चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव ग्रामपंचायतीला सर्वाधिक ७९ गुण समितीने दिले आहेत. तर सर्वात कमी गुण भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीला मिळाले असून त्याची संख्या ५५ आहे. पुढील वर्षी सहभागी गावांची संख्या वाढणार आहे.स्मार्ट ग्रामसाठी याबाबी आवश्यकगावात वैयक्तिक शौचालय सुविधा व त्याचा वापर, सार्वजनिक इमारतीमध्ये शौचालय सुविधा व त्याचा वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचतगट, प्लास्टिक वापरावर बंदी, ग्रा.पं.ची गृह व पाणी कर वसुली, पथदिव्यांची सोय, ग्रामसभांचे आयोजन, एलईडी दिव्यांचा वापर, सौर पथदिवे, बायोगॅस संयंत्राचा वापर, वृक्ष लागवड, जलसंधारण, ग्रामपंचायतीचे संकेतस्थळ आदी बाबी स्मार्ट ग्राम होण्यासाठी गावात असणे आवश्यक आहे.