शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

साग वृक्षांची कत्तल वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:21 IST

पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा बिटात मौल्यवान साग वृक्षाची दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देसावलखेडा बिटमधील प्रकार : वनविभागाच्या दुर्लक्षामुळे तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा बिटात मौल्यवान साग वृक्षाची दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.आरमोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा बिटात कक्ष क्र.३० व ३१ च्या शेकडो हेक्टर वनजमिनीवर २० ते २५ वर्षांपूर्वी साग लागण्यात आले होते. आज या साग वृक्षाची गोलाई ६० ते ८० से.मी. आहे. उंची ५० फुटापेक्षा अधिक आहे. सावलखेडा बिटातून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते. सावलखेडा बिटातील शेकडो हेक्टरवरील साग लक्ष वेधून घेते. या सागवानाने संपूर्ण आरमोरी तालुक्यात आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र सोन्याच्या किंमतीने विकल्या जाणाऱ्या सागवानाची वनतस्करांकडून अवैध तोड होत आहे. ३० व ३१ क्रमांकाच्या कम्पार्टमेंटमध्ये शेकडो झाडे करवतीच्या सहाय्याने कापली जात आहेत. या जंगलात नेहमीच चौकीदार वनरक्षक फिरत असल्याचे सांगितले जाते. मात्र हे वनरक्षक व चौकीदार केवळ रस्त्यानेच फिरतात. जंगलात मात्र शिरत नाही. ही बाब वनतस्करांना माहित असल्याने जंगलाच्या अगदी मध्यभागी जाऊन वृक्षतोड केली जात आहे. एक झाड २० हजार रूपये किमतीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. शेकडो झाडे तोडण्यामुळे वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे.या सागवान झाडांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनकर्मचाºयांवर आहे. मात्र सदर वनकर्मचारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सागवानाची तोड वाढली आहे.एकीकडे शासन १३ कोटी वृक्ष लावण्याची तयारी करीत आहे. यावर शेकडो कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. तर दुसरीकडे जीवंत असलेले व पूर्ण वाढ झालेली वृक्ष तोडली जात आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोडीची चौकशी करण्याची मागणी आहे.वनकर्मचारी खुटही करतात नष्टवनतस्कर थोड्या उंचीवरून झाडाची तोड करतात. खुट राहिल्यास त्याची चौकशी होऊन वनकर्मचाºयावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वनकर्मचारी राहिलेले खुटही पूर्णपणे तोडून नष्ट करून टाकतात. त्यामुळे खुट मापण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाºयाला याचा पत्ता लागत नाही. याचा सर्वाधिक तोटा म्हणजे तोडलेले झाड पुन्हा पालत नाही.