शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

क्रिमिलेअरमधून कुणबी जातीला वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:07 IST

क्रिमिलेअरच्या तत्त्वातून कुणबी जातीला वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय कुणबी समाज संघटना व युवा कुणबी महासंघ तालुका देसाईगंजच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ....

ठळक मुद्देएसडीओमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन : युवा कुणबी महासंघाची कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : क्रिमिलेअरच्या तत्त्वातून कुणबी जातीला वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय कुणबी समाज संघटना व युवा कुणबी महासंघ तालुका देसाईगंजच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.यासंदर्भात दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व कुणबी समाजबांधवांनी बुधवारी थेट देसाईगंजच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरे, डॉ. प्रा. हितेंद्र धोटे, धनपाल मिसार, मारोती बगमारे, लोकमान्य बरडे, ज्ञानेश्वर कवासे, राजेंद्र बुल्ले, किशोर कुथे, एकनाथ पिलारे, शामराव तलमले, मनोज ढोरे, सदाराम ठाकरे यांच्यासह देसाईगंज तालुक्यातील बहुसंख्य कुणबी बांधव उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्टÑ राज्य मागावर्गीय आयोगाने तयार केलेल्या अहवालातील घोषणेनुसार राज्यातील १०३ जातींना क्रिमिलेअरच्या तत्त्वातून वगळण्यात आले आहे. मात्र या अहवालात कुणबी या जातीचा उल्लेख नाही. त्यामुळे कुणबी समाजावर अन्याय झाला आहे. कुणबी समाज हा अनेक पोटजातीत विखुरला असून महाराष्टÑात पूर्वीपासून शेतीशी निगडीत समाज असल्याने हा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. शेती हा कुणबी समाजाचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. अद्यापही कुणबी समाजाची फारशी प्रगती झाली नाही. शासनाकडून या समाजावर अन्याय होत असून शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे महाराष्टÑात सन २०१४ ते २०१६ या कालावधीत ३ हजार ८८१ शेतकरी आत्महत्या झाल्या. यात विदर्भातील ३० टक्के शेतकरी कुणबी समाजातील आहे. मराठवाड्यातील १६ टक्के कुणबी समाजातील शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे या समाजाला न्याय देण्यासाठी क्रिमिलेअरची अट शिथिल करून या अटीतून कुणबी समाजाला वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिष्टमंडळाने एसडीओंशी चर्चा केली.