शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा वाहने जप्त

By admin | Updated: February 5, 2017 01:27 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिरोंचानजीकच्या

महसूल विभागाची कारवाई : जानमपल्लीतही सापळा सिरोंचा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिरोंचानजीकच्या गोदावरी नदी पात्रात व जानमपल्ली येथे धाडसत्र राबवून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चार ट्रक व दोन ट्रॅक्टर अशी एकूण सहा वाहने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पकडले. शासकीय अटी व शर्तीचा भंग करून रेती उत्खनन करणारी वाहने पकडल्याची कारवाई सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने केली. पकडण्यात आलेल्या ट्रकमध्ये टीएस ०८ यूए २१२४, टीएस ८ यूबी ४५६७, एपी २८ टीई ५०६२, टीएस ०२ यूबी ३१३२ या क्रमांकाच्या वाहनांचा समावेश आहे. गोदावरी नदीच्या पात्रातून उत्खनन करून आंतरराज्यीय पुलावरून वाहतूक करण्याच्या तयारीत असताना महसूल प्रशासनाने ही कारवाई केली. जानमपल्ली चक शिवारात रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले. एमएच ३३ एफ ४३४८ व टीएस ०२ यूए ८९३२ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. जप्त केलेली सर्व वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली आहे. याशिवाय विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा काढण्यात आली. कर्मचारी घरी परतल्यावर पुन्हा हवा भरून आरोपींनी पलायन केले. सदर फरार आरोपींना आत्मसमर्पण करण्याची हमी देऊन कारवाई सौम्य करण्यासाठी काही दलाल तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. वृत्त लिहिपर्यंत जप्त झालेल्या वाहनांविरूध्द कोणती दंडात्मक कारवाई झाली हे कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)