शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सहा विद्यार्थी आढळले स्थलांतरित

By admin | Updated: January 3, 2016 02:01 IST

राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राहिली पाहिजे, असा निर्णय घेतला आहे.

गडचिरोलीत शोधमोहीम : शिक्षण विभागाचा उपक्रमगडचिरोली : राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राहिली पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या धोरणानुसार गडचिरोली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी उध्दव डांगे यांच्या नेतृत्वात शनिवारी शहरात स्थलांतरित विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी इयत्ता पहिली, तिसरी व चौथीचे सहा स्थलांतरित विद्यार्थी आढळून आले. सदर सहा स्थलांतरित विद्यार्थी मध्यप्रदेश व भोपाळ राज्यातील असून २८ डिसेंबर२०१५ रोजी रोजगारासाठी त्यांचे कुटुंबिय गडचिरोली शहरात स्थलांतरित झाले आहेत. सदर कुटुंब येथे उघड्यावर तंबू ठोकून वास्तव्याला आहेत. स्थलांतरित विद्यार्थ्यांमध्ये करणसिंह प्रकाश गुजर (७), निर्मल पिंटू पवार (११), करण इमलसिंग गुजर (८), राहुल निमयसिंग सोळंकी (८), रोशनी दिलीप पवार (८), शिवानी दिलीप पवार (६) यांचा समावेश आहे. सदर सहा स्थलांतरित विद्यार्थ्यांना गडचिरोली येथील नगर पालिकेच्या राजीव गांधी प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले असून हे विद्यार्थी ४ डिसेंबर सोमवारपासून शाळेत येणार आहेत. जेव्हा सदर विद्यार्थी स्वत:च्या गावाकडे स्थलांतरित होतील, तेव्हा त्यांना शिक्षण हमी कार्ड देऊन पाठविण्यात येणार आहे. जेणे करून त्यांना त्यांच्या गावी शिक्षण घेता येईल, असे गट शिक्षणाधिकारी उध्दव डांगे यांनी सांगितले आहे. विद्यार्थी शोधमोहिमेच्या पथकात निखिल कुमरे, संगीता खोब्रागडे, लता धात्रक, केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार, डी. एस. आकरे आदींचा समावेश होता. (स्थानिक प्रतिनिधी)