शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांसाठी सहा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:56 IST

आदिवासी विकास विभागाने जिल्ह्यातील सहा आश्रमशाळांच्या इमारतींसाठी ११ कोटी ४० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केले जात आहे.

ठळक मुद्देइमारतींचे बांधकाम सुरू : मार्कंडादेव, कुरंडीमाल, येंगलखेडा येथील शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभागाने जिल्ह्यातील सहा आश्रमशाळांच्या इमारतींसाठी ११ कोटी ४० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केले जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४७ शासकीय आश्रमशाळा आहेत. यातील बहुतांश आश्रमशाळांची निर्मिती ३० ते ४० वर्षांपूर्वी करण्यात आली होती. यातील काही इमारती कौलारू आहेत तर काही इमारतींवर टीन आच्छादले आहे. बहूतांश इमारती मोडकळीस आल्या आहेत. यामध्ये वसतिगृहाचांही समावेश आहे. अनेक इमारतींच्या छतामधून पावसाचे पाणी कोसळत असल्याने रात्री झोपने कठीण होत होते. वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थ्यांना साप चावल्याच्याही घटना घडल्या होत्या. त्यामुळे नवीन इमारतींचे बांधकाम करण्याची मागणी होत होती. आदिवासी विकास विभागाने त्याला मान्यता दिली असून निधीही उपलब्ध करून दिला आहे.चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव आश्रमशाळेचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आरमोरी तालुक्यातील कुरंडीमाल आश्रमशाळेसाठी ५० लाख रूपये, रेगडी येथील आश्रमशाळेसाठी १ कोटी ५० लाख, येंगलखेडा वसतिगृहाच्या बांधकामासाठी दोन कोटी रूपये, गडचिरोली येथील मुलांच्या वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी ५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व कामांची निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी बांधकामही सुरू झाले आहे.नव्याने बांधण्यात आलेल्या इमारती सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज राहतात. मात्र या इमारतींची एक वर्षाच्या कालावधीतच वाट लावली जाते. विद्यार्थी खिडक्यांची तावदाने तोडतात. वर्गखोल्यांमध्ये खर्रा व पानाच्या पिचकाºया पडलेल्या दिसून येतात. ही अतिशय गंभीर बाब आहे. काही निवडक विद्यार्थ्यांच्या चुकींचा भोग सर्व विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. मात्र याकडे आश्रमशाळा प्रशासनही दुर्लक्ष करते. आदिवासी विकास विभाग डागडुजीसाठी नंतर निधी उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे दोन वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे.तहसीलचे हस्तांतरण रखडलेआरमोरी व कुरखेडा येथे तहसील कार्यालय बांधले जात आहे. या दोन्ही इमारतींचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. थोडेफार काम बाकी आहे. मात्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे या इमारतींचे हस्तांतरण रखडले आहे. नवीन इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊनही जुन्याच इमारतीत सध्या कार्यालय सुरू आहे. शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.