शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विजेविना नागरिकांचे हाल

By admin | Updated: July 22, 2016 01:20 IST

कोटगल वीज उपकेंद्रातील ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने संपूर्ण गडचिरोली शहर, गडचिरोली तालुका व धानोरा तालुक्याच्या रांगी ...

१९ तास वीजपुरवठा खंडित : कोटगलच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड गडचिरोली : कोटगल वीज उपकेंद्रातील ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने संपूर्ण गडचिरोली शहर, गडचिरोली तालुका व धानोरा तालुक्याच्या रांगी परिसराचा वीज पुरवठा बुधवारी रात्री ९ वाजता खंडित झाला. संपूर्ण रात्री व गुरूवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे हाल झाले. कोटगल येथील वीज उपकेंद्रातून गडचिरोली शहर, गडचिरोली तालुक्यातील बहुतांश गावे व धानोरा तालुक्यातील रांगी परिसराला वीज पुरवठा केला जातो. बुधवारच्या रात्री या उपकेंद्रातील ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाला. विद्युत कर्मचाऱ्यांनी सदर बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे रात्री १.३० वाजता आरमोरीवरून विद्युत पुरवठा घेऊन कॉम्प्लेक्स परिसरात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर गुरूवारी सकाळी ६.३० वाजेपासून कॉम्प्लेक्स परिसरात विद्युत पुरवठा खंडित करून सदर वीज गडचिरोली शहराच्या इतर भागांना देण्यात आली. मात्र गडचिरोली शहराचा लोड जास्त असल्याने ही लाईनसुद्धा ब्रेकडाऊन झाली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून व्याहाडवरून वीज पुरवठा घेण्यात आला. मात्र गडचिरोली शहराचा लोड सांभाळत नसल्याने दुपारी दीड वाजता व्याहाडवरून येणारा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला. रात्री १० वाजेपासून वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोटगल येथील ट्रॉन्सफॉर्मरमधील बिघाड शोधून तो दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी गुरूवारी नवीन ट्रॉन्सफॉर्मर लावण्यात आले. नवीन ट्रॉन्सफॉर्मर लावण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर वीज पुरवठा गुरूवारी दुपारी ४.२० वाजता पूर्ववत झाला. (नगर प्रतिनिधी) जिल्हा सामान्य रुग्णालय व पाणीपुरवठा प्रभावित बुधवारच्या रात्री ९ वाजतापासून संपूर्ण गडचिरोली शहरासह धानोरा तालुक्याच्या रांगी भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. गुरूवारी दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयात शौचालय तसेच बाथरूममध्येही पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे सर्वत्र घाण पसरली होती. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वसाहतीचा व रुग्णालयाचा पुरवठा सुरू झालेला नव्हता. गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा योजनेवर खंडित वीज पुरवठ्याचा परिणाम झाला. सकाळी व सायंकाळी गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही.