शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचाचे बाल विकास प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:40 IST

तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुला-मुलींना पोषण आहार पुरविण्यासोबतच त्यांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी केंद्रांवर आहे. बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडी केंद्राच्या वतीने गर्भवती माता व मुला, मुलींना विविध योजनांचा लाभ दिला जातो.

ठळक मुद्देअहेरीच्या अधिकाऱ्यांकडे प्रभार : पर्यवेक्षिका सांभाळते प्रशासकीय कारभार; योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुला-मुलींना पोषण आहार पुरविण्यासोबतच त्यांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी केंद्रांवर आहे. बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडी केंद्राच्या वतीने गर्भवती माता व मुला, मुलींना विविध योजनांचा लाभ दिला जातो. मात्र सिरोंचा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने या कार्यालयाचा कारभार सध्या वाºयावर असल्याचे दिसून येते.अहेरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही.के.गडदे यांच्याकडे प्रकल्प अधिकाºयांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. मात्र ते अहेरी येथून ये-जा करीत असल्याने पूर्णवेळ देऊ शकत नाही. त्यांच्या अनुपस्थितीत या कार्यालयाचा कारभार उषा भांडेकर नावाच्या पर्यवेक्षिका सांभाळतात. येथे विस्तार अधिकारी व परिचाराचेही पद रिक्त आहे. याशिवाय या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत मदतनीसांचे सहा पदे रिक्त आहेत. या कार्यालयात नियमित व स्थायी प्रकल्प अधिकारी नसल्याने तालुक्यातील अंगणवाडी केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची अंमलबजावणी केली जाते. अंगणवाडी केंद्रस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा प्रकल्प कार्यालयामार्फत घेतला जातो. मात्र सिरोंचाच्या कार्यालयात नियमित व स्थायी अधिकारी नसल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे.सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमधील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शिवाय अंगणवाडी सेविका व मदतनीसांची अनेक पदे रिक्त आहेत. शासनाकडे सातत्याने मागणी करूनही प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारीसह अंगणवाडी सेविका व मदतनीसांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बाल विकास योजनेचा बट्ट्याबोळ होत आहे.प्रकल्प कार्यालय इमारतीची दुरवस्थासिरोंचा येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयाला अद्यापही स्वतंत्र व पक्की इमारत नाही. जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या पडक्या इमारतीत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नाही. तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्राच्या सेविकांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रशस्त हॉलही नाही. त्यामुळे या पडक्या इमारतीतच बैठका घेतल्या जातात. सदर कार्यालयाची इमारत कौलारू असून कवेलू फुटलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या कार्यालयात पाणी गळती लागले. कार्यालयाच्या सभोवताल गवत उगवले आहे. एकूणच प्रकल्प कार्यालय इमारत व परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहे.