शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा-पातागुडम मार्ग खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:48 IST

सिरोंचा-पातागुडम मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : पूल व मेडिगड्डा प्रकल्पाच्या कामामुळे वर्दळ वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा-पातागुडम मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले आहेत.सिरोंचापासून मेडिगड्डा प्रकल्प २४ किमी अंतरावर आहे. तर पातागुडम हे गाव ५६ किमी अंतरावर आहे. मेडिगड्डा प्रकल्पाचे काम तेलंगणा सरकारच्या वतीने केले जात आहे. पातागुडम येथे पूल निर्मितीचेही काम सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी साहित्याची ने-आण करण्यासाठी या मार्गाने सिरोंचा मार्गाने मोठमोठे अवजड ट्रक ये-जा करतात. सिरोंचात सोमवारी, अंकिसात मंगळवारी व आसरअल्लीत शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या तीन बाजारांच्या दिवशी वाहनांची मोठी वर्दळ राहते. याच मार्गाने आसरअल्लीजवळील सोमनूर संगम पाहण्यासाठी अनेक पर्यटक ये-जा करतात. एकंदरीतच दुचाकी, चारचाकी, सायकलस्वार, पायदळ व अवजड वाहनांची या मार्गावरून नेहमी वर्दळ राहते. वाहनांच्या वर्दळीमुळे सदर मार्ग प्रचंड प्रमाणात उखडला आहे. डांबरवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. या मार्गाची दुरूस्ती करण्यासाठी अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनपर्यंत मार्गाची दुरूस्ती झाली नाही. पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या आणखी गंभीर झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून आहे. एखादे जड वाहन या ठिकाणावरून गेल्यानंतर सभोवताल पाणी उडते. यामुळे दुचाकीस्वार किंवा सायकलस्वार ओलेचिंब होत आहेत. सदर मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली