शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा, अहेरीत न्यायालयीन कामकाज बंद

By admin | Updated: April 1, 2017 01:56 IST

राष्ट्रीय विधी आयोगाने अ‍ॅड. अ‍ॅक्ट १९६१ मध्ये दुरूस्ती करण्यासंदर्भात अ‍ॅडव्होकेट (अमेंडमेंट अ‍ॅक्ट) बिल २०१७ केंद्र सरकारकडे पाठविले ...

एकदिवसीय आंदोलन : अधिवक्ता संघ सहभागी; विधेयकाला देशभरातून विरोध अहेरी/सिरोंचा : राष्ट्रीय विधी आयोगाने अ‍ॅड. अ‍ॅक्ट १९६१ मध्ये दुरूस्ती करण्यासंदर्भात अ‍ॅडव्होकेट (अमेंडमेंट अ‍ॅक्ट) बिल २०१७ केंद्र सरकारकडे पाठविले असून सदर दुरूस्तीविधेयक संसदेसमोर ठेवले जाणार आहे. या दुरूस्ती विधेयकामध्ये वकिलांवर अन्यायकारक व जाचक अशा तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. या विरोधात ३१ मार्च रोजी अहेरी व सिरोंचा येथील न्यायालयातील अधिवक्त्यांनी एक दिवसीय न्यायालयीन कामकाज बंद आंदोलन केले. या आंदोलनात अहेरी येथे अधिवक्ता संघटनेचे अ‍ॅड. सतीश जैनवार, अ‍ॅड. उदय गलबले, अ‍ॅड. ढोके, अ‍ॅड. गलबले आदींसह सिरोंचा येथे तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. टी. जे. कोंडागोर्ला, उपाध्यक्ष एस. एस. चिट्टावार, सचिव अ‍ॅड. के. व्ही. तोकलवार, कोषाध्यक्ष अ‍ॅड. एस. आर. तोटावार यांच्यासह इतर सदस्य सहभागी झाले होते. या विधेयकासंदर्भात माहिती देताना अधिवक्ता संघटनेने म्हटले आहे की, नव्या तरतुदीनुसार १० वर्षापेक्षा कमी अनुभव असलेल्या वकिलांना निवडणूक लढण्यापासून वंचित केले आहे. वकिलाविरूद्ध प्राप्त झालेल्या तक्रारीसंदर्भात प्रचलित कायद्याप्रमाणे बार कॉन्सिल आॅफ इंडिया चौकशी समिती नेमून प्रकरण चालवित होते. परंतु नवीन दुरूस्ती विधेयकामध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त व जिल्हा न्यायालयाच्या निवृत्ती न्यायाधीशाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायाधीश व वकिल यांचा संबंध लक्षात घेता कायद्यातील गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊन वकिलांना भयंकर मानसिक त्रास भोगावा लागेल. तसेच वकिलांना संपाबाबत न्यायालयीन कामकाजाबाबत अनेक जाचक निर्बंध या दुरूस्ती विधेयकामध्ये समावेश करण्यात आले आहे. सदर विधेयक लोकशाही विरोधी असून वकिलांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे दुरूस्ती विधेयक संसदेत मांडण्यात येऊ नये, याकरिता निषेध म्हणून न्यायालयीन कामकाज एक दिवस बंद करण्याचा निर्णय बार कॉन्सिल आॅफ इंडियाने घेतला. त्यात अधिवक्ता संघ सहभागी झाल्याचे संघटनेच्या सदस्यांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)