शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाची ख्याती पोहोचतेय महाराष्ट्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:51 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सी ३५३ हा साकोलीवरून येऊन गडचिरोली, चामोर्शी, आलापल्ली, सिरोंचा आणि पुढे तेलंगणातील वरंगल येथे समाप्त होतो. ...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सी ३५३ हा साकोलीवरून येऊन गडचिरोली, चामोर्शी, आलापल्ली, सिरोंचा आणि पुढे तेलंगणातील वरंगल येथे समाप्त होतो. सिरोंचा-आलापल्ली महामार्गाचे मागील दोन वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. पण पुन्हा या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने आता ते बुजविण्याचे काम सुरू आहे. पण त्या कामातही दर्जा नाही.

दररोज शेकडो नागरिकांना या मार्गावरून तालुका मुख्यालयात कार्यालयीन कामे अथवा बँकिंगच्या कामासाठी यावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आपले वाहन किंवा बस खड्ड्यातून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. नांदगाव फाट्याजवळ व अमरावती गावाजवळ खड्ड्यांमुळे ट्रक फसून वाहतूक ठप्प होण्याची बाब नित्याचीच झाली होती. या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था गंभीर असल्याची माहिती वरिष्ठ अभियंत्यांना असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मागील दोन वर्षांपूर्वी व ९ महिन्यांपूर्वी या मार्गावर कोट्यवधींचा निधी खर्च करूनही मार्गावर एवढे मोठमोठे खड्डे कसे, याची चौकशी आतापर्यंत कोणीही केलेली नाही. त्यावरून अधिकारी-पदाधिकाऱ्यांची साखळीच ्असल्याचे दिसून येते.

खड्डे बुजवल्यानंतरही काही दिवसांनी पुन्हा या महामार्गाची अवस्था वाईट होणार यात शंका नाही. याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.

गेल्या पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावरचे डांबरीकरण उखडून माती बाहेर पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यात ट्रक फसून अनेक वेळा ट्रॅफिक जाम झाला. अशा स्थितीत एखादा रुग्ण त्यात फसल्यास आणि त्याचे बरेवाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

(बॉक्स)

खड्डे बुजवण्यावर आतापर्यंत किती खर्च?

सध्या सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. वापरलेली गिट्टी आणि डांबर योग्य दर्जाचे नसून खड्ड्यांमध्ये डांबर कमी आणि गिट्टीच जास्त टाकली जात आहे. दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी असा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र काम योग्यप्रकारे होत नाही आणि परिस्थिती जैसे थे होते. आतापर्यंत अशा खड्डे बुजवण्यावर किती रुपयांचा निधी खर्च झाला याचाही हिशेब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.