शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा-आलापल्ली-अहेरी मार्ग खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

अहेरी उपविभागातील सिरोंचा भागातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मार्गाची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान आश्वासनाच्या पलिकेडे नागरिकांना काहीही मिळाले नाही. सध्याच्या आधुनिक युगात दळणवळण सेवेला अत्यंत महत्त्व आहे.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून पक्की दुरूस्ती नाही : गर्भवती माता व रुग्णांना करावा लागताहे धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा-आलापल्ली-अहेरी हा ११५ क्रमांकाचा राज्य महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून त्यात पावसाचे पाणी साचले. परिणामी गर्भवती माता व विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना या मार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.अहेरी उपविभागातील सिरोंचा भागातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मार्गाची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान आश्वासनाच्या पलिकेडे नागरिकांना काहीही मिळाले नाही. सध्याच्या आधुनिक युगात दळणवळण सेवेला अत्यंत महत्त्व आहे. गावा-गावाला व शहरा-शहराला जोडणारे रस्ते पक्के झाल्याशिवाय त्या भागातील विकास शक्य नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने आपापल्यास्तरावर पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत मुख्य रस्ते पक्क्या स्वरूपाचे बनविण्याचे काम गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात सुरू आहे. मात्र रस्ता विकासाचा अनुशेष अहेरी उपविभागात अजूनही कायम आहे.सिरोंचा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. यापेक्षा मोठे रुग्णालय अहेरी येथे आहे. अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात सिरोंचाच्या रुग्णालयातून गंभीर रुग्ण रेफर केले जातात. यासाठी सिरोंचा, आलापल्ली, अहेरी या मार्गाने आवागमन करावे लागते. मात्र या रस्त्यावर दोन फूट खोल व दीड ते दोन फूट रूंद असे मोठे खड्डे असल्याने रुग्णवाहिकेला सुद्धा अहेरीला पोहोचण्यासाठी विलंब होतो. खड्ड्यांमधून धक्के खात अहेरीला जावे लागते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने ११५ क्रमांकाच्या सिरोंचा-आलापल्ली राज्य महामार्गाची पक्की दुरूस्ती केली नाही.खड्डे बुजविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावलेसिरोंचा-आलापल्ली या मार्गाची दुरवस्था झाली असून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सिरोंचा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. द होप फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित तेपट्टीवार, समीर अरिगेला, रिजवान खान, अतुल सोनेकर, समीर, रिजवान यांनी रस्ता दुरूस्तीसाठी सहकार्य केले. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक