शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिम्युलेटर मशीन देणार डिझेल बचतीचे धडे

By admin | Updated: December 6, 2014 01:32 IST

बसचालकांमध्ये डिझेल बचतीविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली आगाराला चंद्रपूर विभागीय कार्यालयाच्या मार्फतीने सिम्युलेटर मशीन प्राप्त झाली ...

गडचिरोली : बसचालकांमध्ये डिझेल बचतीविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली आगाराला चंद्रपूर विभागीय कार्यालयाच्या मार्फतीने सिम्युलेटर मशीन प्राप्त झाली असून सदर मशिनच्या साहाय्याने डिझेल बचतीचे धडे दिले जाणार आहेत. एसटीच्या एकूण खर्चापैकी सर्वाधिक खर्च डिझेलवर होतो. त्यामुळे डिझेल बचतीसाठी एसटीकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. यामध्ये सर्वाधिक केपीटीएल (किलोमीटर पर टेन लिटर) देऊन डिझेल बचत करणाऱ्या चालकाचा सत्कार करण्यात येतो. तर कमी केपीटीएल देणाऱ्या चालकांना समजूत देण्यात येते. त्याचबरोबर डिझेल बचतीसाठी वाहन नेमके कसे चालवावे, याबाबतचेही विशेष प्रशिक्षण चालकांना देण्यात येते. मात्र एसटीला डिझेल बचत करण्यात पाहिजे त्या प्रमाणात यश प्राप्त झाले नाही. गडचिरोली आगारात दोन दिवसापूर्वीच चंद्रपूर विभागीय कार्यालयाने तयार केलेली सिम्युलेटर मशिन पाठविण्यात आली आहे. सदर मशिन एसटीच्या इंजिनप्रमाणे असून विशिष्ट प्रमाणात एक्सलेटर वाढविल्यानंतर इंजिनमधून किती डिझेल जाते. याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक चालकांना दाखविले जाणार आहे. मशीनचे एक्सलेटर वाढविल्यानंतर डिझेल एका भांड्यात जमा होते. अनावश्यक एक्सलेटर वाढविल्यामुळे किती डिझेल वाया जातो. या मशिनमुळे कळणार आहे. आजपर्यंत डिझेल बचतीविषयी अनेकवेळा चालकांचे समुपदेशन करण्यात येत होते. मात्र अनावश्यक डिझेल खर्च होण्याची प्रक्रिया मशीनच्या आतमध्येच घडत असल्याने त्याच्या मनपटलावार फारसा परिणाम होत नव्हता. या मशीनमुळे मात्र किती डिझेल अनावश्यक खर्च होतो, हे प्रत्यक्ष डोळ्याने बघता येणार आहे. त्यामुळे चालकांच्या डोळ्यासमोर अनावश्यक डिझेल खर्च होण्याची प्रत्यक्ष प्रतिमा निर्माण होण्यास मदत होणार आहे. ज्यावेळी चालक एक्सलेटर वाढविल त्यावेळी आपण किती अनावश्यक डिझेल खर्च करीत आहोत, याची कल्पना येण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)