शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा, मुलचेरा येथे मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:43 IST

जनहितयाचिका सुप्रीम कोर्टात १९६/२००१ या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश वाधवा यांच्या आयोगाने सन २०१० साली स्वस्त धान्य दुकानदारांचा भागनिहाय फिरून खर्च काढण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देनिवेदन : वाढत्या महागाईनुसार वाहतूक भाडे, कमिशन व हमालीचा खर्च द्या

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा/मुलचेरा : जनहितयाचिका सुप्रीम कोर्टात १९६/२००१ या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश वाधवा यांच्या आयोगाने सन २०१० साली स्वस्त धान्य दुकानदारांचा भागनिहाय फिरून खर्च काढण्यात आलेला आहे. तो देण्याची मागणी करण्यात आली. मात्र शासनाने अद्यापही सुप्रीम कोर्टाच्या आयोगानुसार दुकानदारांना खर्च अदा केला नाही. याशिवाय स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आरमोरी येथे गुरूवारी तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढून तहसीलदार यशवंत धाईत यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.नगर परिषद क्षेत्रात ५२ हजार ५०० व ग्रामीण भागात ४७ हजार ५०० असा खर्च काढून सुप्रीम कोर्टाला शिफारस करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे २०१७ सालाप्रमाणे वाढत्या महागाईनुसार हा खर्च देण्यात यावा, ५० हजार केरोसीन दुकाने बंद केल्याने तसेच काहींचा केरोसीन कोटा कमी केल्याने दुकानदारांवर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे त्यांच्या दुकानातून गॅस वितरण करण्यात यावे, वाहतूक भाडे, कमिशन व हमाली भाड्याची सात वर्षांची रक्कम व्याजासहीत अदा करावी, एपील कार्डधारकांना कोलकाता सरकारप्रमाणे भाव ठरवून माल देण्यात यावा, आदी मागण्याचा निवेदनात समावेश आहे.धानोरा येथे तहसीलदारांना निवेदन देताना संघटनेचे तालुका अध्यक्ष जाकीर कुरेशी, समीर कुरेशी, जगन्नाथ राजगडे, भाष्कर चांभारे, मुरलीधर गेडाम, नारायण हेमके, विमल कुमोटी, माधव गोटा यांच्यासह दुर्गा महिला बचत गट मरारटोला, आदिवासी महिला बचत गट कोलारबोडी, संघर्ष महिला बचत गट कन्हाळगावचे पदाधिकारी व बरसादू चिराम, केशव पदा आदी उपस्थित होते.मुलचेरा येथे तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांना निवेदन देताना संघटनेच्या उपाध्यक्ष गीता सरकार, सचिव मनिंद्र हालदार, निरंजन मिस्त्री, व्ही. बी. कडते, पेंदाम, इष्टाम, योगीता विरमलवार, सिडाम, मडावी, बुधीबाई हलामी यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले आहे. आपल्या मागण्यांवर स्वस्त धान्य दुकानदार आक्रमक झाले आहे.