शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

झुडपी जंगलाचा तिढा कायम

By admin | Updated: August 7, 2014 23:58 IST

जिल्ह्याच्या विकासात अडथळा ठरत असलेले झुडपी जंगल क्षेत्र मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे जिल्हा विकासासाठी आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु शासनाने निर्णय

गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासात अडथळा ठरत असलेले झुडपी जंगल क्षेत्र मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे जिल्हा विकासासाठी आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु शासनाने निर्णय घेतल्यानंतर अनेक दिवसांचा कालावधी लोटूनही अजूनपर्यंत यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. वनकायद्याच्या कचाट्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. जिल्ह्यात १५ हजार ६० हेक्टर क्षेत्रावर झुडपी जंगल आहे. यापैकी १ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रातील झुडपी जंगलावर अतिक्रमण करण्यात आले आहे. ५ हजार ८७६ हेक्टर झुडपी जमीन वनोत्तर विभागात असल्याची माहिती आहे. राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. अनेक सिंचन प्रकल्पांना वनविभागाच्या जागेची आवश्यकता आहे. शासनाच्यावतीने झुडपी जंगलाचा कायदा करण्यात आल्यानंतर अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. यापैकी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाचा खर्च आवाक्याबाहेर गेल्यानंतर शासनाच्यावतीने जिल्ह्यात उपसिंचन योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र उपसा सिंचन योजनांनाही शेकडो हेक्टर वनजमिनीची गरज आहे. वनविभागाच्या धोरणानुसार एखाद्या प्रकल्पास वनविभागाची जागा मागितल्यानंतर त्या जागेच्या दुप्पट जागा तसेच पर्यायी वनिकरण करण्यासाठी रक्कम संबंधीत विभागास अदा करावी लागत होती. मात्र पर्यायी वनजमीन न मिळाल्याने जिल्ह्यातील उपसा सिंचन, लघू सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. मार्च महिन्यात शासनाच्यावतीने विदर्भातील झुडपी जंगल मुक्त करून त्यावर सार्वजनिक हिताचे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. अनेकांना रोजगारा प्राप्त होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली होती. परंतु तीन ते चार महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही शासनाच्यावतीने या संदर्भात परिपत्रक काढण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने घोषणा करूनही अजूनपर्यंत झुडपी जंगल वनकायद्याच्या कचाट्यातून मुक्त करण्याच्या निर्णयाचे परिपत्रक का काढले नाही, शासन झुडपी जंगल मुक्त करण्याबाबत उदासीन का आहे, असा परखड सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)