शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम कथा जीवन जगण्याचा मंत्र शिकविते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:35 IST

प्रभू श्रीरामचे चरित्र व उद्धारता दाखविणारे ग्रंथ म्हणजे ‘श्रीराम कथा’ आहे. या श्रीराम कथेतून मनुष्य आपले जीवन सुलभ कसे जगावे, हे शिकवित असते, ...

ठळक मुद्देपरमानंद महाराज यांचे प्रवचन : शिव विवाह सोहळ्याच्या राम कथेतून भाविक मंत्रमुग्ध

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : प्रभू श्रीरामचे चरित्र व उद्धारता दाखविणारे ग्रंथ म्हणजे ‘श्रीराम कथा’ आहे. या श्रीराम कथेतून मनुष्य आपले जीवन सुलभ कसे जगावे, हे शिकवित असते, असे प्रवचन परमपुज्य परमानंद महाराजांनी श्रीराम कथेचे दुसरे पुष्प गुफतांना बोलत होते.गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर ८ जानेवारीपासून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या दुसºया दिवशी भक्ती व विश्वास याबाबत ते राम कथेच्या माध्यमातून प्रवचन करीत होते. भगवान शिवशंकराने श्रीरामचंद्राच्या भक्तीत संपूर्णपणे आपले जीवन विश्वासासोबत समर्पित केले. मात्र देवी सतीने श्रीराम चंद्राची भक्ती तर केली पण मनात विश्वास ठेवला नाही. त्यामुळे ती परमेश्वराला ओळखू शकली नाही. भक्तीमध्ये जर विश्वास असेल तर निश्चितच आपण परमेश्वराची अनुभूती करू शकाल, अशी श्रीराम कथा मनुष्यांना संदेश देत असते. कलियुगात जर सुखी-सुमृद्धी जीवन जगायचे असेल तर प्रभू श्रीरामाचे नाव अंत:करणातून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे.गुडमार्निंग व गुडइव्हिनिंग तसेच सकाळी चहाचा कप हातात घेणे यासारख्या पाश्चात्य संस्कृतीला बळ न देता हिंदू सनातन संस्कृतीतून सकाळी व सायंकाळी मनुष्याने मनुष्याला राम-राम असे म्हटले पाहीजे व हातात चहाचा कप न घेता दोन्ही हात जोडून सर्वप्रथम आपल्या गुरूजन, आई-वडील व सूर्यनारायणाला नमस्कार केला पाहिजे. आपल्या सुखी-समृद्ध जीवनाची सुरुवात केली पाहिजे, असे प्रवचन परमानंद महाराज यांनी राम कथेतील भाविक-भक्तांना संबोधित करताना दिले.श्रीरामचंद्राच्या व शिव विवाहाचे सुंदर तसेच संगीतमय भजांनाचा भाविक भक्तांनी मनसोक्त आनंद लुटला. श्रीराम कथा एकण्यासाठी शेकडो महिला व पुरूष भाविक उपस्थित राहत आहेत. श्रीराम कथेबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे धार्मिक वातावरण निर्माण होण्यास फार मोठी मदत झाली असल्याचे दिसून येत आहे.