शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडच्या देवळातला श्रीगणेश

By admin | Updated: September 19, 2015 01:58 IST

लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी जनसामान्यात जागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली.

८६ वर्षांची परंपरा कायम : जिल्ह्यातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचा मानवैरागड : लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी जनसामान्यात जागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. त्याचे लोण देशभर पसरले. त्या कालखंडात दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिवंगत गो. ना. मुनघाटे यांचे वडील नारायणराव मुनघाटे वैरागड येथे तलाठी होते. त्यांनी १९२९ मध्ये वैरागडच्या गाढे मोहल्ल्यातील देवळात गणेशोत्सवाला सुरूवात केली. गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव होता, अशी मान्यता आहे. सरकारी दप्तरी काम करणारे तलाठी नारायण मुनघाटे म्हणजे देशभक्तीने भारावलेले व्यक्तीमत्त्व. त्यांनी त्या काळातील त्यांचे सहकारी दिवंगत मारोतराव बोडणे, केशवराव लांजेवार, गणपती बोडणे, भैय्याजी पोपळी, धर्मा आयटलवार, सखूबाई बोधनकर, कोंडेकार यांच्या सहकार्याने गाढे मोहल्ल्यातील देवळात गणेश चतुर्थीपासून ८६ वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. तेव्हा चंद्रपूर व गडचिरोली हा एकच जिल्हा होता. तेव्हा स्थानिक चंद्रपूर शहरात केवळ दोन सार्वजनिक गणेश मंडळे होती. गडचिरोली येथे सुरेश पोरेड्डीवार यांच्या घरी खासगी गणपतीची स्थापना होत असे आणि वैरागड येथे देवळात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असे. सन १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाली. गडचिरोली या स्वतंत्र जिल्ह्याचा विचार केल्यास वैरागडच्या देवळातील सार्वजनिक गणपतीला गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या गणपतीचा मान आहे. आजही या गणेशोत्सवाची परंपरा कायम आहे. तलाठी नारायण मुनघाटे यांच्या मृत्यूनंतर दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गो. ना. मुनघाटे हे नित्य नेमाने येथे गणेशाच्या दर्शनाला यायचे. त्यांच्या पश्चात आता त्यांचे चिरंजीव प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे हे गणेशाला वंदन करण्यासाठी दरवर्षी वैरागड येथे येतात. ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आजही कायम राखली आहे. या गणेशोत्सवासाठी रघुनाथ मानकर, राजू बावणे, बालाजी पोपळी, शिवा गरवे, घनशाम लांजेवार, श्रीराम कामतकर, चिंतामन बावणकर, नेताजी नेवारे, दुमाने आदी मंडळी सहकार्य करीत आहेत. वैरागडचा हा ८६ वर्षांचा जूना सार्वजनिक उत्सव अजुनही उत्सवाच्या पठडीतच साजरा केला जातो. धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. (वार्ताहर)