शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत पोहोचले मीठ तुटवड्याचे लोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

माणसाच्या भोजनातील मीठ हे आवश्यक घटक मानले जाते. मिठाशिवाय भोजन अथवा कुठल्या खाद्यपदार्थाला चव येत नाही. मीठ सहज उपलब्ध होत असल्याने कुणीही साठाही करून ठेवत नाही. विशेष म्हणजे बरेच दुकानदार मिठाच्या चुंगड्या दुकानाच्या बाहेर ठेवतात. अशी परिस्थिती असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून धानोरा, कुरखेडा, कोरची तालुक्याच्या काही भागात कोरोना संचारबंदीच्या काळात मिठाचा तुटवडा निर्माण होत असल्याची अफवा पसरली.

ठळक मुद्देदुप्पट भावाने विक्री : गरजेपेक्षा अधिक प्रमाणात मिठाची खरेदी करण्यासाठी ग्रामीण नागरिकांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मिठाचा तुटवडा निर्माण झाला असून आता मिठ मिळणार नाही, अशी अफवा छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात पोहोचली. कोरची, कुरखेडा, धानोरा तालुक्यानंतर आता हे अफवेचे लोण चक्क गडचिरोली शहरापर्यंत पोहोचले. बुधवारी दिवसभर ग्रामीण नागरिकांनी गडचिरोलीच्या बाजारपेठेत मीठ खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. त्याचा गैरफायदा घेत अनेक व्यापाऱ्यांनी दुप्पट दराने मिठाची विक्री केली.माणसाच्या भोजनातील मीठ हे आवश्यक घटक मानले जाते. मिठाशिवाय भोजन अथवा कुठल्या खाद्यपदार्थाला चव येत नाही. मीठ सहज उपलब्ध होत असल्याने कुणीही साठाही करून ठेवत नाही. विशेष म्हणजे बरेच दुकानदार मिठाच्या चुंगड्या दुकानाच्या बाहेर ठेवतात. अशी परिस्थिती असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून धानोरा, कुरखेडा, कोरची तालुक्याच्या काही भागात कोरोना संचारबंदीच्या काळात मिठाचा तुटवडा निर्माण होत असल्याची अफवा पसरली. अफवेचे हे लोण अर्ध्याअधिक जिल्ह्यात पसरले. परिणामी काही दिवसानंतर दुकानात मीठ उपलब्ध होणार नाही, असा अंदाज बांधून जिल्ह्यातील काही नागरिकांनी अधिकच्या मिठाची खरेदी करणे सुरू केले. काही व्यावसायिकांनी याचा फायदा घेत तुटवडा निर्माण होत असल्याच्या अफवेत भर घालून अधिक भावाने मीठाची विक्री केली.शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरातील बाजारपेठ तसेच आठवडी बाजारातील किराणा दुकान परिसरातून सायकल व दुचाकीवरून मीठ नेल्या जात असल्याचे दिसत होते. एक किलो मीठाचे पाकिट २० रुपयाला विकल्या जाते. मात्र बुधवारी हे पाकिट ३० रुपयाला घेतल्याचे काही महिलांनी लोकमतला सांगितले. तुटवडा असल्याने वरूनच भाव वाढले, असे दुकानदाराने सांगितल्याचे या महिला म्हणाल्या.१६० रुपये किलोला मिळणारी मिठाची बॅग बुधवारी चक्क ४०० रुपये दराने विकली जात होती. विशेष म्हणजे माडेमुल येथील काही नागरिकांनी किराणा दुकानातून ४०० रुपयाला बॅग खरेदी केली. शहरातील काही विक्रेत्यांनी मात्र प्रामाणिकपणे मिठाचा तुटवडा नाही, गर्दी करू नका, असे सांगत मूळ दरात विक्री केली.भरपूर मीठ उपलब्ध, अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई- जिल्हाधिकारीगडचिरोली जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये मिठाचा तुटवडा असल्याची चुकीची अफवा पसरली असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही. मोठ्या प्रमाणात मीठ साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे खोट्या अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी जास्तीच्या मिठाची खरेदी करू नये, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. कुरखेडा व धानोरा तालुक्यांमध्ये काही लोकांकडून चुकीची अफवा पसरवण्यात आली. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत. अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी जास्तीचे मीठ खरेदी केल्यामुळे संबंधित तालुक्यात मीठ संपल्याचे समोर आले आहे. दुकानदारांनी ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन मीठ विक्री करू नये. येणाºया ग्राहकांना खरी माहिती द्यावी. कोणतीही अफवा पसरवत असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा आणि त्याबाबत खात्री करून घ्या, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.फंटर ग्राहकांच्या माध्यमातून कारवाईची गरजमीठ हा आवश्यक खाद्यपदार्थ असल्याने तो मिळाला नाही तर कसे? या भितीपोटी ग्राहक अधिकचे पैसे देऊनही ते खरेदी करत आहेत. पण याबद्दल तक्रार देण्याच्या भानगडीत पडण्यास कोणीही नागरिक तयार नाही. पुढेही याबाबतच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रशासन व पुरवठा विभागाने स्वत:च पुढाकार घेऊन फंटर ग्राहकाच्या माध्यमातून गडचिरोली शहरासह जिल्हाभरात मिठाच्या या काळाबाजाराची पोलखोल करावी आणि जादा दराने मिठाची विक्री करणाऱ्या संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.