शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कमी मुदतीचे धानपीक शेवटच्या टप्प्यात; यंदा तूर पिकही जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:40 IST

दमदार पाऊस झाल्याने यंदा धान, तूर व इतर पिके जोमात आहेत. सद्य:स्थितीत हलक्या प्रतीच्या व कमी मुदतीचे धानपीक अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाने शेतशिवार हिरवेगार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी सरासरी ९६ टक्के पाऊस होणार होता. हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र सुरूवातीच्या काळात अपेक्षित पाऊस बरसला नाही. मात्र त्यानंतर पावसाची आकडेवारी वाढली. दमदार पाऊस झाल्याने यंदा धान, तूर व इतर पिके जोमात आहेत. सद्य:स्थितीत हलक्या प्रतीच्या व कमी मुदतीचे धानपीक अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.सुरूवातीचे मृग, आद्रा, पुनर्वसू हे चांगल्या पावसाचे नक्षत्रात पाऊस कमी प्रमाणात बरसला. परिणामी शेतकरी यंदाचा हंगाम कसा होणार या विवंचनेत सापडला आहे. दरम्यान जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात नियमित पाऊस झाल्याने यंदा धान पिकासोबतच तूर पीकही जोमात आहे.गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने ज्या धानपट्ट्यात खरिपाच्या पिकाची हानी झाली तो भाग वगळता इतर ठिकाणी पीक परिस्थिती उत्तम आहे. यावर्षी सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस झाला. सुरूवातीला विद्युत पंपाच्या सहाय्याने धान रोवणी करण्यात आली. अशा शेतकऱ्यांचे धानाचे पीक बहरले. रासायनिक खताच्या मात्रा पिकांना देण्यात आल्या. दरम्यान गादमाशी, खोडकिडी व इतर रोगांचा धान पिकांवर प्रादुर्भाव झाला. मात्र शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्याने रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला.

गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे पीक शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहे. यावर्षी तुरीचे पीक डौलात असून भरघोष उत्पादन येणार अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. कमी मुदतीचे धानपीक शेवटच्या टप्यात असून हलक्या पिकासाठी शेतकऱ्यांना अलिकडेच झालेल्या पावसाचा चांगला फायदा झाला आहे. वैरागड परिसरासह संपूर्ण आरमोरी तालुका व गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागात यंदा धान व तुरीचे पीक जोमात असल्याचे दिसून येत आहे.

कृषी कर्मचारी बांधावरयावर्षी धान व इतर पिके जोमात असली तरी वातावरणाच्या बदलामुळे काही भागात धान पिकावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर उपाययोजना सुचविण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पिकावरील रोग आटोक्यात आणण्यासाठी फवारणी केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती