शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

महसूलच्या धडक कारवाईने रेती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

मागील महिन्यापासून महसूल विभागाने शेकडाे ब्रास रेती जप्त केली. लाखाे रुपयांचा दंड आकारला. अवैध वाहतूक करणारी वाहणे जप्त करून गुन्हा दाखल केला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे रेती मिळेनाशी झाली. परिणामी शहरातील शासकीय व खासगी बांधकामे ठप्प पडली आहेत. तसेच  घरकुलांचीही कामे रेतीअभावी  बंद आहेत. अनेकांनी नवीन घरकुलाचे बांधकाम रेतीअभावी सुरूच केले नाही.

ठळक मुद्देबांधकामे ठप्प : अवैध उपशाविराेधात प्रशासन झाले सतर्क, रेती तस्करांची गाेची

  लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यात लाॅकडाऊनापासूनच अवैध रेती वाहतूक व विक्रीचा गाेरखधंदा सुरू हाेता. याबाबत महसूल प्रशासनाकडे अनेकांनी तक्रारीही केल्या हाेत्या. या तक्रारींची दखल महसूल  विभागाने घेत महिनाभरापासून अवैध रेती खनन व वाहतूक विराेधात धडक कारवाई सुरू केल्याने तालुक्यात रेती मिळेनाशी झाली. सध्या संपूर्ण बांधकामे ठप्प पडली आहेत. मागील महिन्यापासून महसूल विभागाने शेकडाे ब्रास रेती जप्त केली. लाखाे रुपयांचा दंड आकारला. अवैध वाहतूक करणारी वाहणे जप्त करून गुन्हा दाखल केला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे रेती मिळेनाशी झाली. परिणामी शहरातील शासकीय व खासगी बांधकामे ठप्प पडली आहेत. तसेच  घरकुलांचीही कामे रेतीअभावी  बंद आहेत. अनेकांनी नवीन घरकुलाचे बांधकाम रेतीअभावी सुरूच केले नाही. विशेष एटापल्लीपासून ४ किमी अंतरावरील आलदंडी नदीतून शहरात अवैध रेती माेठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात हाेती. मागील महिन्यात प्रथमच उपविभागीय मनाेज जिंदल, तहसीलदार अजयकुमार अष्टे यांनी शहरात फिरून शासकीय व खासगी कामांची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांना ज्या ठिकाणी अवैधरित्या रेती साठविलेली आढळून आली, तेथील रेती जप्त करण्याचे आदेश दिले. महसूल  विभागाने सतत तीन दिवस कारवाई करून शहरातून शेकडाे ब्राॅस रेती जप्त करून तहसील कार्यालयासमाेर गाेळा केली. तसेच  रेतीची साठवणूक करणाऱ्यांवर दंड ठाेठावून गुन्हा दाखल केला. व तस्करी करणाऱ्यांची वाहने जप्त केली. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैधरित्या रेतीची वाहतूक करण्याचे धाडस कुणीही करताना सध्या तरी दिसून येत नाही. बांधकामासाठी छत्तीसगड राज्यातून रेती आणणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बांधकामे ठप्प आहेत.  तसेच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांचाही राेजगार सध्या हिरावला आहे. त्यामुळे शासनाने लवकर रेती घाटांचे लिलाव करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे. 

दाेन विभागांच्या कचाट्यात रेती तस्करएटापल्ली तालुक्याच्या आलदंडी नदीतून उत्कृष्ट दर्जाची रेती दरवर्षी प्राप्त हाेते. परंतु यावर्षी रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेती मिळण्यास अडचणी येत आहेत. १५०  किमी अंतरावरील छत्तीसगड राज्यातून  रेती आणावी लागत आहे. अवैध रेती तस्कर आलदंडी नदीतून रेतीचा उपसा  करण्यासही धजावत नसल्याचे सध्या दिसून येत आहे. आलदंडी नदी वनविभागाच्या हद्दीत असल्याने रेती उपसा करताना वनाधिकाऱ्यांची भीती तर  वाहतूक करताना व साठवणूक केल्यानंतर महसूल विभागाच्या कारवाईची भीती अशा दाेन विभागाच्या कचाट्यात रेती तस्कर सापडले आहेत.

 

टॅग्स :sandवाळू