शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:03 IST

प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देवीज पुरवठा सुरळीत करा : महावितरणसमोर केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चानंतर मागण्यांचे निवेदन सादर केले.एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना अजूनही वीज पुरवठा झाला नाही. परिणामी तेथील नागरिकांना अंधारातच जीवन कंठावे लागत आहे. अनेक शेतकºयांनी शेतात वीज पुरवठा करून पंप बसविण्यासाठी वीज विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही त्यांना वीज पुरवठा करण्यात आला नाही. अनेकांकडे विहिरी आहेत. मात्र पंप नसल्याने बेकामी ठरल्या आहेत. ग्रामीण भागातील काही नागरिकांना १० ते १५ हजार रूपयापर्यंतचे बिल पाठविले जात आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. घरात दोन बल्ब, एक पंखा असतानाही १० ते १५ हजार रूपयांचे बिल कसे पाठविले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील काही दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तीन ते चार दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नाही. बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेच्या समस्या त्यांच्या लक्षात येत नाही. सर्व कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.सदर मोर्चा उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुंचावार, कामगार सेना प्रमुख विलास परमेलवार, रेणुका बोरूले, बालू शेंडे, सुशिला रच्चावार, रमेश गंगावणवार, वसंत चापले, श्यामसुंदर कुंभारे, बंडू तलांडे, दलसू तलांडे, महेश बिरमवार, राजू उसेंडी, बंडू पुंगाटी, रितूू कुळेपेटी, श्यामदास पुंगाटी, लालू मडावी, दोहे तलांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.