शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

शिवसैनिकांची सडक योजना कार्यालयावर धडक

By admin | Updated: February 19, 2016 01:44 IST

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निमगाव- मोहटोला रस्त्याचे खडीकरण- डांबरीकरण व उंच पुलाचे बांधकाम करावे,

गडचिरोली : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निमगाव- मोहटोला रस्त्याचे खडीकरण- डांबरीकरण व उंच पुलाचे बांधकाम करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अभियंता एन. आर. चिंतावार यांना गुरूवारी दोन तास घेराव घालून आंंदोलन करण्यात आले. निमगाव- मोहटोला मार्ग धानोरा व गडचिरोली तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. मात्र सदर मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. शिवाय या मार्गावरील पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असते. परिणामी नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही त्रास होतो. विद्यार्थ्यांना अनेकदा शिक्षणापासून वंचित राहावे लागते. सध्या या मार्गावरील गिट्टी पूर्णत: उखडल्याने बसफेऱ्याही बंद पडल्या आहेत. याबाबीचे गांभीर्य ओळखून शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. येत्या मार्चपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सदर रस्त्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर बगमारे, युवा सेना तालुका प्रमुख तेजस नरड, उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, सरपंच ईश्वर दुग्गा, सुनील नक्षिणे, योगेश कुडवे, संतोष लांजेवार, विशाल देशमुख, प्रफुल चापले, राहूल सोरते, हरबा दाजगाये, प्रमोद बोबाटे, जीवन चापले, राजेंद्र वरखडे, विलास दाजगाये, माधव भुरसे, सुरेश होळी, अविनाश झोडे, महेश झोडे, रवींद्र मडावी, महेश भुरसे, प्रशांत देवगिरकर, आशिष नक्षिणे, आकाश टेकाम, जगदीश मेश्राम, राजू भांडेकर, योगेश लेनगुरे, खुशाल साखरे, मुखरू सोनबावणे, आशिष सोरते, वसंत मडावी, महेश भोयर, नामदेव कुमरे, राजू जवादे, प्रशांत सोरते, सोनु लाडे व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)