शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीचा सौरभ तुरे जिल्ह्यात पहिला

By admin | Updated: May 26, 2016 02:20 IST

गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल एटापल्ली तालुक्याचा ८९.७२ टक्के लागला आहे.

जिल्ह्याचा निकाल ८२.७१ टक्के : शिवकृपा महाविद्यालयाचा प्रतीक भुरसे जिल्ह्यात दुसरागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल एटापल्ली तालुक्याचा ८९.७२ टक्के लागला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आठ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीचा सौरभ अविनाश तुरे हा ९२.४६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिला आला आहे. गडचिरोलीच्या शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा प्रतीक अनिल भुरसे हा ९१.०७ टक्के गुण घेऊन दुसरा तर गडचिरोलीच्या प्लॅटिनम ज्युबिली कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची अश्विनी ऋषी कुळमेथे ही विद्यार्थिनी ८९ टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. जिल्ह्यात सरासरी निकालात मुलांच्या तुलनेत मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातून १२ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५३ विद्यार्थी प्राविण्यासह तर २ हजार २२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. ७ हजार १८१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६४५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झालेत. १० हजार २०६ विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळाले आहे. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.७२ टक्के, कला शाखेचा निकाल ७६.८८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८८.३६ टक्के तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमाचा निकाल ७६.२३ टक्के लागला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पुनर्परीक्षार्थींचा जिल्ह्याचा निकाल २९.७२ टक्केगडचिरोली जिल्ह्यातून ६१३ विद्यार्थ्यांनी १२ वीच्या पुनर्परीक्षेसाठी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एक विद्यार्थी प्राविण्यासह, सात विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व १३७ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. ६०९ पैकी केवळ १८१ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी २९.७२ टक्के आहे. पुनर्परीक्षार्थींच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल ५२.४८, कला शाखेचा निकाल २५.२२, वाणिज्य शाखेचा निकाल ३५.२९ व किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाचा निकाल १८.५२ टक्के लागला आहे.जिल्ह्यात मुलांच्या निकालाची टक्केवारी ८१.१५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८४.३६ टक्के आहे.