शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शिवपांदणलगतचा बंधारा दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:20 IST

शेतकऱ्यांना पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी देसाईगंज तालुक्यातील कुरुड-कोंढाळा शिवपांदणलगत लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी पर्याप्त सोयीच उपलब्ध करून .....

ठळक मुद्देलाखो रूपयांचा खर्च व्यर्थ : कुरूड-कोंढाळा परिसरातील शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शेतकऱ्यांना पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी देसाईगंज तालुक्यातील कुरुड-कोंढाळा शिवपांदणलगत लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी पर्याप्त सोयीच उपलब्ध करून देण्यात न आल्याने शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. सदर बंधारा अद्यापही दुर्लक्षित असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तालुक्यातील कुरुड कोंढाळा शिवपांदण रस्त्यालगत १९९५ मध्ये कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याच्या माध्यमातून लगतच्या शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पाणी अडवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने सदर बंधारा कुचकामी ठरला आहे. योग्य नियोजनाअभावी शासनाचे लाखो रुपये व्यर्थ खर्च झाले आहेत.सदर बंधाºयाचे नुतनीकरण करण्यासाठी २००३ मध्ये पुन्हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून पुरेशा सोयी उपलब्ध करून देण्याऐवजी कार्यारंभ आदेशात बंधाºयावर स्लॅब टाकण्याचे कुठलेही नियोजन नसताना कार्यारंभ आदेश व अंदाजपत्रकाला बगल देत संबंधित विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने बांधकामाच्या निधीची अफरातफर केली. त्यामुळे सदर बंधारा बांधकामातून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध न झाल्याने निरूपयोगी ठरला आहे.बंधाºयालगतचे खोलीकरण केल्यास व पाणी अडविण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यास सदर बंधारा शेतकºयांसाठी वरदान ठरू शकतो. या बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती कोंढाळा ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. बांधकामाची चौकशी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.